28. येक श्रीमंत तरणो अधिकारी

28. येक श्रीमंत तरणो अधिकारी — चित्र 1

येके दिवशी, येक श्रीमंत तरणो अधिकारी येशुकडे येवन विचारूक लागलो, "उत्तम गुरुजी, सार्वकालिक जीवन मिळाक व्हया म्हणान मीया काय करू?" येशून तेका म्हटल्यान, "तू माका 'उत्तम' असो कित्याक म्हणतस? येक जो देव तेच्याशिवाय कोणच उत्तम नाया. पण तुका सार्वकालिक जीवन व्हया हा, तर देवाचे आज्ञा पाळ."

28. येक श्रीमंत तरणो अधिकारी — चित्र 2

"कोणते आज्ञा मीया पाळूची गरज आसा?" तेना इचारल्यान. येशून उत्तर दिल्यान, "खून करू नको. व्यभिचार करू नको. चोरी करू नको. खोटा बोला नको. आपल्या आवशी-बापाशीचो मान राख, नी जशी आपल्यार तशी आपल्या शेजाऱ्यार प्रीति कर."

28. येक श्रीमंत तरणो अधिकारी — चित्र 3

पण त्या तरुणान म्हटल्यान, "हे सगळे आज्ञा मीया लहानपणापासना पाळीत इलय. कायमचो जिवंत ऱ्हवाक माका आणखी काय करूची गरज हा?" येशून तेच्याकडे बघल्यान नी तेच्यार प्रीति केल्यान.

28. येक श्रीमंत तरणो अधिकारी — चित्र 4

येशून उत्तर दिल्यान,"जर तुया पुरो होवक बघतस, तर जा नी तुझी सगळी मालमत्ता इकून इललो पैसो गोरगरिबांका दी, म्हणजे तुका स्वर्गात संपत्ती मिळात. मगे ये नी माझ्यामागना चलाक लाग."

28. येक श्रीमंत तरणो अधिकारी — चित्र 5

येशूचा ह्या बोलणा आयकान तो तरुण लय निराश झालो, कारण तो मॉप श्रीमंत व्हतो नी आपल्या जवळची मालमत्ता दुसऱ्यांका देवक तयार नव्हतो. तो येशूकडना निघान गेलो.

28. येक श्रीमंत तरणो अधिकारी — चित्र 6

मगे येशून आपल्या शिष्यांका म्हटल्यान, "श्रीमंतांका स्वर्गाच्या राज्यात जावक लय कठीण हा! होय, श्रीमंतांचो स्वर्गाच्या राज्यात प्रवेश व्हना, हेच्यापेक्षा उंटाचा सुईच्या नेड्यातना जाणा सोप्या हा."

28. येक श्रीमंत तरणो अधिकारी — चित्र 7

जेळाक शिष्यांनी ह्या आयकल्यानी तेळाक तेंका आश्चर्याचो धक्को बसलो नी ते म्हणाक लागले, "तर मगे कोणाचा तारण व्हना सोप्या हा?"

28. येक श्रीमंत तरणो अधिकारी — चित्र 8

येशून शिष्यांकडे बघून म्हटल्यान, "माणसांका ह्या अशक्य हा, पण देवाक सगळा काय शक्य हा."

28. येक श्रीमंत तरणो अधिकारी — चित्र 9

पेत्र येशूक म्हणालो, "आम्ही सगळा सोडून तुझ्यापाठी इलव, हेचा आमका काय प्रतिफळ मिळतला?"

28. येक श्रीमंत तरणो अधिकारी — चित्र 10

येशून उत्तर दिल्यान, "जेंनी माझ्यासाठी घरा, भाव, बहिणी, आवस, बापुस, पोरा नाय तर मालमत्ता सोडल्यानी हा, तेंका ता १००पटीन जास्त मिळतला नी तेच्याबरोबर अनंत काळाचा स्वर्गीय जीवन ह्या वतन मिळातला. पण पयले ते शेवटचे नी शेवटचे ते पयले असा मॉप जणांचा व्हयत."

बायबलातली गोष्ट : मत्तय 19:16 - 30; मार्क 10: 17 - 31; लूक 18:18 - 30

रीडर में पढ़ें

खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।