30. येशू पाच हजारांका जेवाण देता

30. येशू पाच हजारांका जेवाण देता — चित्र 1

येशून आपल्या प्रेषितांका मॉप गावातना लॉकांका सुवार्ता सांगूक नी शिक्षण देवक पाठयल्यान. जेळाक ते येशुकडे परत इले, तेळाक तेंनी आपण केलली सगळी कामा येशूक सांगल्यानी. तेळाक येशून तेंका तळ्याच्या पलीकडे शांत जागेर काय येळ इश्रांती घेवक आपल्या बरोबर बोलयल्यान. म्हणान ते तारवात बसले नी तळ्याच्या पलीकडे पोचले.

30. येशू पाच हजारांका जेवाण देता — चित्र 2

पण त्या जागेर मॉपशे लॉक व्हते, तेनी येशू नी शिष्यांका तारवात बसान जाताना बघल्यानी. तो लॉकांचो घोळको तेंच्या आधी तळ्याच्या पलीकडे जावक तळ्याच्या काठाकडे धावलो. म्हणान येशू नी शिष्य त्या जागेर पोचले, तेळाक येक मोठो लॉकांचो घोळको तेंची वाट बघित थय थांबलो व्हतो.

30. येशू पाच हजारांका जेवाण देता — चित्र 3

त्या लॉकांच्या घोळक्यात जवळजवळ ५००० बापये व्हते, तरी बायका नी पोरा मोजूक नाय व्हती. येशूक तेंचो कळवळो इलो. येशूक ह्यो घोळको मेंढपाळ नसलल्या मेंढरांसारखो दिसान इलो. तेळाक तो तेंका शिकवक लागलो नी तेंच्यातल्या आजारी लॉकांका बरे केल्यान.

30. येशू पाच हजारांका जेवाण देता — चित्र 4

दुपारी उशीरान, शिष्यांनी येशुकडे जावन सांगल्यानी, "लय उशीर झालो हा नी हय जवळ गावव नाया. तेळाक लॉकांका पाठवन दी म्हणजे ते आपल्याक काय तरी खावक घेतीत."

30. येशू पाच हजारांका जेवाण देता — चित्र 5

पण येशून शिष्यांका म्हटल्यान, "तुम्हीच तेंका काय तरी खावक देवा!" ते बोलले,"आम्ही कसा काय यवढ्या मोठ्या घोळक्याक जेवाण देव शकतव? आमच्याकडे फक्त पाच भाकरे नी दोन माशे आसत."

30. येशू पाच हजारांका जेवाण देता — चित्र 6

येशून शिष्यांका सांगल्यान की, तेंनी लॉकांका हिरवळीर पन्नास पन्नासाचे पंक्ती करून बसाक सांगायचा.

30. येशू पाच हजारांका जेवाण देता — चित्र 7

मगे येशून ते पाच भाकरे नी दोन माशे घेवन वरती आकाशाकडे बघल्यान नी त्या अन्नार देवाचो आशिर्वाद मागल्यान.

30. येशू पाच हजारांका जेवाण देता — चित्र 8

मगे येशून ते भाकरे नी माश्यांचे तुकडे केल्यान. मगे तेना शिष्यांकडे लॉकांका वाढुक दिल्यान. शिष्य लॉकांका वाढीतच ऱ्हवले तरी त्या अन्न संपला नाय. सगळे लॉक जेवन तृप्त झाले.

30. येशू पाच हजारांका जेवाण देता — चित्र 9

तेच्यानंतर, शिष्यांनी उरलले भाकरे नी माश्यांचे तुकडे गोळा केल्यानी नी तेचे बारा टोपले भरले. ह्या सगळा जेवाण फक्त पाच भाकरे नी दोन माश्यांतूरना पुरवला गेला.

बायबलातली गोष्ट : मत्तय 14:13-21; मार्क 6:31-44; लूक 9: 10 - 17; योहान 6 : 5 - 15

रीडर में पढ़ें

खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।