31. येशू पाणयार चलता

31. येशू पाणयार चलता — चित्र 1

तेळाक लॉकांका घराक पाठवन देयत आसताना येशून शिष्यांका नावेत बसान समुद्राच्या पलीकडे जावक सांगल्यान. सगळे लॉक निघान गेल्यार येशू डोंगरार प्रार्थनेक गेलो. येशू थय येकटोच व्हतो नी रात्री लय उशिरापर्यात तो प्रार्थना करीत ऱ्हवलो.

31. येशू पाणयार चलता — चित्र 2

तोपर्यात, शिष्य नाव व्हलवीत ऱ्हवले, पण बरीच रात्र झाली तरी ते समुद्राच्या मधल्याभागापर्यातच पोचले व्हते. लय कष्टान ते नाव व्हलवीत व्हते कारण जोराचो वारो तेंच्या इरुद्ध व्हावत व्हतो.

31. येशू पाणयार चलता — चित्र 3

तेळाक येशू प्रार्थना संपवन शिष्यांकडे इलो. तो समुद्रारना पाणायार चलत तेंच्या नावेकडे येयत व्हतो!

31. येशू पाणयार चलता — चित्र 4

येशूक बघून शिष्य लय घाबारले, कारण तेंका वाटला की ते खयच्या तरी भुताक बघतत. येशूक ठावक व्हता की, ते घाबारले आसत म्हणान तेना तेंका म्हटल्यान, "भिया नको. मीयाच आसय!"

31. येशू पाणयार चलता — चित्र 5

तेळाक पेत्रान येशूक म्हटल्यान, "प्रभुजी, जर आपण आसास, तर माका पाणयार चलाची आज्ञा देवा." येशून पेत्राक म्हटल्यान, "ये!"

31. येशू पाणयार चलता — चित्र 6

म्हणान पेत्र नावेतना उतरान येशुकडे जावक पाणयार चलाक लागलो. पण थोडा अंतर चलल्यार तेना आपली नजर येशूरना काढल्यान नी तो लाटेंकडे नी वाऱ्याकडे बघुक लागलो.

31. येशू पाणयार चलता — चित्र 7

तेळाक पेत्राक भिती वाटली नी तो पाणयात बुडाक लागलो. तो मोठ्यान वराडलो, "प्रभुजी, माका वाचवा!" येशू लगेच तेच्याकडे पोचलो नी तेका धरल्यान. मगे तेना पेत्राक म्हटल्यान, "अरे अल्पविश्वासु माणसा, तुया संशय कित्याक धरलस?"

31. येशू पाणयार चलता — चित्र 8

जेळाक पेत्र नी येशू दोघव नावेत चढले, तेळाक लगेच वारो थांबलो नी पाणी शांत झाला. ह्या बघून शिष्यांका मोठा आश्चर्य वाटला. तेंनी येशूक नमन केल्यानी नी म्हटल्यानी, "तुया खरोखरच देवाचो झिल आसस."

बायबलातली गोष्ट : मत्तय 14 : 22 - 33; मार्क 6 : 45 - 52; योहान 6 : 16 - 21

रीडर में पढ़ें

खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।