32. येशू येका भूतग्रस्त माणसाक नी आजारी बायक बरो करता
येके दिवशी, येशू नी तेचे शिष्य नावेत बसान समुद्राच्या पलीकडे गसरेकर ऱ्हवत असलल्या प्रदेशात गेले.
सरोवराच्या पलीकडे जाताच येक भूतग्रस्त माणूस येशुकडे धावत इलो.
ह्यो माणूस येवढो शक्तिमान व्हतो की कोणच माणसा तेका नियंत्रणात ठेव शकत नाय व्हती. लॉकांनी तेचे हात नी पाय साखळदंडांनी नी बेडयेंनी बांधल्यानी, पण त्ये तो तोडून टाकी.
तो माणूस कबरेंतूर ऱ्हवायचो. तो रात्रंदिवस मोठ्यान आरडत ऱ्हवा. तो आंगार कपडे घालीत नसायचो नी आपला आंग दगडांनी नुसता ठेचून घेयत ऱ्हवा.
जेळाक तो माणूस येशुकडे इलो, तेळाक येशूच्या पुढ्यात येवन तेना गुडघे टेकल्यान. येशून त्या दुष्टात्म्याक म्हटल्यान, "ह्या माणसातना भायर निघ!"
भूतग्रस्त माणूस जोरात आराडलो, "परात्पर देवाच्या झिला येशू, तुया मधी कशाक पडतस? कृपया माका छळू नको!" तेळाक येशून दुष्टात्म्याक (अशुद्ध आत्म्याक, भुताक) इचारल्यान, तुझा नाव काय हा?" तो बोललो, "माझा नाव सैन्य हा, कारण आम्ही मॉपजण आसव." ('लीजन' ह्यो शब्द रोमी सेनेतल्या हजारो सैनिकांच्या गटाक व्हतो.)
ते दुष्टात्मे येशूक इनंती करूक लागले, "कृपया आमका ह्या प्रांतातना घालवन देव नको!" बाजूच्या टेकडेर डुकरांचो कळप चरत व्हतो. म्हणान, दुष्टात्म्यांनी इनंती केल्यानी, "कृपया त्याऐवजी आमका डुकरांतूर पाठय!" येशून म्हटल्यान, "जावा!"
तेळाक दुष्टात्मे त्या माणसातना निघान डुकरांतूर घुसले. तेळाक ती डुकरा कड्यारना खाली पळत गेली नी समुद्रात बुडली. त्या कळपात जवळजवळ २००० डुकरा व्हती.
ह्या बघून डुकरा राखणारे धावत नगरात गेले नी तेनी झाललो ह्यो प्रकार नी येशून काय केल्यान ह्या प्रत्येकाक सांगल्यानी. तेळाक नगरातल्या लॉकांनी येवन त्या भूतग्रस्त माणसाक बघल्यानी. तो शांत बसललो, आंगार कपडे घातललो नी येक सामान्य वागणाऱ्या माणसासारखो असो तेनी तेका बघल्यानी.
ह्या बघून लॉक लय घाबारले नी तेंनी येशूक तेंचो प्रांत सोडून जावक सांगल्यानी. तेळाक येशू मचव्यात बसान जावक तयार झालो. पूर्वी भूतग्रस्त आसनारो माणूस येशूच्या बरोबर जावक इनंती करूक लागलो.
पण येशून तेका म्हटल्यान, "नाय, तुया तुझ्या घराक जा नी आपल्या मित्रांका नी घरच्या सगळ्यांका सांग की देवान तुझ्यासाठी काय केल्यान नी तुझ्यार कशी दया दाखयल्यान हा."
तेळाक तो माणूस निघालो नी देवान तेच्यासाठी काय केल्यान हा तेची साक्ष प्रत्येकाक सांगित सुटलो. ह्या आयकनारो प्रत्येकजण आश्चर्यान चकित झालो.
येशू सरोवराच्या पलीकडे परत गेलो. तो थय पोचल्यार लॉकांचो मोठो घोळको तेच्याभवती जमलो नी ते तेच्यार पडाक लागले. त्या घोळक्यात बारा वर्सांपासना रक्तस्रावाची पीडा व्हयत आसलली येक बाय व्हती. तिना आपलो सगळो पैसो वैजार खर्च केलल्यान पण तरीव ती बरी झावक नाय, तर तिची परिस्थिती आजूनव वायट झालली.
तिना आयकलल्यान की येशून मॉप रोग्यांका बरे केल्यान हा नी ती म्हणाक लागली, "माका खात्री हा की, जर मीया नुसतो येशूच्या कपड्याक स्पर्श केलय, तरी बरा व्हयन!" म्हणान तिना येशूच्या मागसून जावन तेच्या कपड्याक स्पर्श केल्यान. तिना कपड्याक स्पर्श करताच तिचो रक्तस्राव थांबलो!
लगेच, येशूक कळला की तेच्या शरीरातना शक्ती गेली हा. म्हणान तेना मागे वेळान बघल्यान नी म्हटल्यान, "माका कोणी स्पर्श केल्यान?"
शिष्यांनी उत्तर दिल्यान, "लॉकांची यवढी गर्दी तुमच्या भवती हा नी ते तुमका चेंगरीत आसत. तर तुम्ही असा काय ईचारतास, "माका कोणी स्पर्श केल्यान?" त्या बायन भियान कापत कापत येशूपुढे जावन गुडघे टेकल्यान. मगे तिना काय केल्यान नी ती कशी बरी झाली ता तेका सांगल्यान. येशून तिका म्हटल्यान, "तुझ्या इश्वासान तुका बरा केल्यान हा. शांतिन जा."
बायबलातली गोष्ट : मत्तय 8: 28 - 34; 9 : 20 - 22; मार्क 5 : 1 - 20; 5 : 24ब - 34; लूक 8 : 26 - 39; 8 : 42ब - 48
खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।