33. पेरणी करणाऱ्याची गोष्ट
येके दिवशी समुद्र किनाऱ्याच्या जवळ येशू लॉकांच्या येका मोठ्या घोळक्याक शिकवण देय व्हतो. मोपशे लॉक तेचा आयकाक येकत्र जमले, तेळाक येशू येका मचव्यात बसलो नी तेना नाव पाणयात थोडी भुतूर ढकलल्यान, हेच्यासाठी की तेका तेंच्याबरोबर बोलाक पुरेशी जागा भेटात. तो मचव्यात बसान लॉकांका शिकवक लागलो.
येशून तेंका ही गोष्ट सांगल्यान. "येक शेतकरी बी पेरूक निघालो. तो हातान पेरणी करीत आसताना काय बी वाटेर पडला नी आकाशातल्या पाखरांनी येवन ता सगळा खावन टाकल्यानी.
‘‘"काय बी खडकाळीर पडला, थय लयच कमी माती व्हती. खडकाळीरला बी लगेच उगावला, पण (माती खोल नसल्यामुळा) तेची मूळा खोलवर जावक शकली नाय. जेळाक सूर्य वर इलो तेळाक ता करापला."
"आणखीन काय बी काटेरी झुडपात पडला. ता बी वाढाक लागला, पण काट्यांनी तेची वाढ खुंटवल्यानी. म्हणान काटेरी झुडपात पडलल्या बियाची वाढ होव शकली नाय नी तेका फळ इला नाय."
"काय बी चांगल्या जमनीत पडला. ता बी उगावला नी वाढला. तेका पीक इला, ३०पट, ६०पट, १०० पट फळ मिळाला. जेका आयकाक कान आसत तो आयको!"
ह्या दाखल्याचो अर्थ शिष्यांका समाजलो नाय. म्हणान येशून स्पष्टीकरण केल्यान, "बी ह्या देवाचा वचन हा. वाटेरची जमीन म्हणजे असो माणूस जो देवाचा वचन आयकता पण समजान घेयत नाय नी सैतान येवन ता मनातना काढून टाकता."
"खडकाळ जमनीर म्हणजे अशी व्यक्ती जी देवाचा वचन आयकता नी आनंदान स्वीकारता. पन कष्ट नी छळ इल्यार लगेच अडखळतत."
"काटेरी जमीन म्हणजे जो देवाचा वचन आयकता, पण कालांतरान सवसाराची चिंता, श्रीमंती नी जगिक सुख हेच्यामुळाक तेचा देवारचा प्रेम कमी व्हयत जाता. हेचो परिणाम म्हणान, तेना आयकलला वचन वायफळ ठरता."
"पण सुपीक जमीन म्हणजे जो माणूस देवाचा वचन आयकान तेच्यार इश्वास ठेयता नी फळ दिता."
बायबलातली गोष्ट : मत्तय 13 :1 -8; 18-23; मार्क 4 : 1 - 8 ; 13 - 20; लूक 8 : 4 - 15
खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।