34. येशू मॉप गोष्टी शिकयता

34. येशू मॉप गोष्टी शिकयता — चित्र 1

येशून देवाच्या राज्याविषय मॉप गोष्टी सांगल्यान. उदाहरण सांगूचा तर, तेना म्हटल्यान, "देवाचा राज्य मोहरीच्या दाण्यासारख्या हा, जो कोणी येकान आपल्या शेतात पेरल्यान. तुमका म्हायत आसा की मोहरीचो दाणो ह्यो सगळ्या बियांतूर येकदम लहान हा."

34. येशू मॉप गोष्टी शिकयता — चित्र 2

पण जेळाक ह्यो मोहरीचो दाणो उगवान वाढता तेळाक बागेतल्या बाकीच्या झाडांपेक्षा ता सगळ्यात मोठा होवन येवढा वाढता की, आकाशातली पाखरा येवन तेच्या फांदयेर ऱ्हवतत."

34. येशू मॉप गोष्टी शिकयता — चित्र 3

येशून आणखीन येक गोष्ट सांगल्यान, "देवाचा राज्य खमीरासारख्या हा जा येका बायन पिठात घातल्यान नी सगळा पीठ फुगान गेला."

34. येशू मॉप गोष्टी शिकयता — चित्र 4

"देवाचा राज्य ह्या शेतात कोणीतरी लपवन ठेयलल्या गुप्त धनासारख्या हा. दुसऱ्या माणसाक ता सापडला नी तेना ता परत पुरून ठेयल्यान. तेका येवढो आनंद झालो की तेना आपली सगळी संपत्ती इकून इलल्या पैश्यांनी ता शात इकत घितल्यान."

34. येशू मॉप गोष्टी शिकयता — चित्र 5

"देवाचा राज्य येका मौल्यवान मोत्यासारख्याव हा. जेळाक मोत्यांच्या व्यापाऱ्याच्या तो नजरेक पडलो, तेळाक तेना तेची सगळी मालमत्ता इकून टाकल्यान नी इलल्या पैश्यांनी तो मौल्यवान मोती इकत घितल्यान."

34. येशू मॉप गोष्टी शिकयता — चित्र 6

तेळाक येशून काय लॉकांका येक गोष्ट सांगितल्यान जे स्वतःच्या चांगल्या कामार भरवसो ठेयत नी दुसऱ्या लॉकांका तुच्छ मानीत. तेना म्हटल्यान, "दोन माणसा प्रार्थना करूक मंदिरात गेले. तेंच्यातलो येक जकातदार नी दुसरो येक धार्मिक पुढारी व्हतो."

34. येशू मॉप गोष्टी शिकयता — चित्र 7

धार्मिक पुढाऱ्यान अशी प्रार्थना केल्यान, "हे देवा, मीया तुका धन्यवाद दितय की मीया दुसऱ्या माणसांसारखो पापी नायय. जे चोरी, अन्याय, व्यभिचार करतत तेंच्यासारखो मीया नायय नी ह्या जकातदारासारखोव नायय."

34. येशू मॉप गोष्टी शिकयता — चित्र 8

"उदाहरणार्थ, मीया आठवड्यातना दोनदा उपास करतय नी आपल्या सगळ्या उत्पन्नाचो दशांश तुका दितय."

34. येशू मॉप गोष्टी शिकयता — चित्र 9

पण तो जकातदार त्या धार्मिक पुढाऱ्यापासना लय लांब उभो व्हतो नी वर स्वर्गाकडेव बघित नाय व्हतो. त्याऐवजी, तेना आपल्या हातांनी छाती बडवून घेतल्यान नी प्रार्थना केल्यान, "देवा, माझ्या पाप्यार दया कर."

34. येशू मॉप गोष्टी शिकयता — चित्र 10

तेळाक येशून म्हटल्यान, "मीया तुमका खरा सांगतय, देवान त्या जकातदाराची प्रार्थना आयकान तेका नीतिमान ठरवल्यान. पण तेका धार्मिक पुढाऱ्याची प्रार्थना आवडाक नाय. देव प्रत्येक घमेंडी माणसाक नीच करीत नी जो स्वतःक नम्र बनवता तेका देव उंचावीत."

बायबलातली गोष्ट : मत्तय 13 : 31 - 33, 44 - 46; मार्क 4 : 30 - 32; लूक 13 : 18 - 21; 18 : 9 - 14

रीडर में पढ़ें

खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।