36. येशूचा रूपांतर
येके दिवशी, येशून आपल्या शिष्यांपैकी पेत्र, याकोब नी योहान ह्या तिघांका आपल्या बरोबर घेतल्यान. योहान नावाचो शिष्य नी जेना येशूचो बाप्तिस्मो केल्यान ते दोघे येकच व्यक्ती नायत.) ते प्रार्थना करूक येका उंच डोंगरार गेले.
येशू प्रार्थना करीत आसताना तेचा तोंड सुर्यासारख्या तेजस्वी झाला नी तेचे कपडे प्रकाशासारखे पांढरेशुभ्र झाले, इतके पांढरेशुभ्र की पृथ्वीरच्या कोणाकच तेवढे पांढरेशुभ्र करता इले नसते.
तेळाक मोशे नी एलिया हे संदेष्टे तेंच्या नजरेक पडले. ही माणसा शेकडो वर्सांपूर्वी ह्या पृथ्वीर होवन गेली व्हती. ते येशूच्या मृत्यूविषय तेच्याबरोबर बोला व्हते, जा यरुशलेमेत घडणार व्हता.
जेळाक मोशे नी एलिया येशूबरोबर बोला व्हते, पेत्रान येशूक म्हटल्यान, "हय आसना आपल्याक बरा आसा. हय आपण तीन मंडप बनवया, येक तुका, येक मोशेक नी येक एलियाक." पेत्र काय बोला व्हतो तेचा तेकाच समजा नाय व्हता.
पेत्र बोलत आसतानाच, येका तेजस्वी ढंगान येवन तेंका घेरल्यान नी ढगातना अशी वाणी झाली की, "ह्यो माझो झिल हा, हेच्यार मीया प्रीति करतय. मीया हेच्याविषय संतुष्ट आसय. तेचा तुम्ही आयका." ते तीनव शिष्य लय भियाले नी जमनीर खाली पडले.
तेळाक येशून तेंका स्पर्श करून म्हटल्यान, "भिया नको. चला उठा." जेळाक तेंनी हकडेतकडे बघल्यानी, तेळाक थय येशूच व्हतो.
येशू नी ते तीन शिष्य परत डोंगरारना खाली उतारले. तेळाक येशून तेंका म्हटल्यान की, "हय जा काय घडला ता कोणाक काययेक सांगा नको. मीया लवकरच मरान नी परत जिवंत व्हयन. तेच्यानंतर तुम्ही ह्या लोकांका सांगू शकतास."
बायबलातली गोष्ट : मत्तय 17:1-9; मार्क 9 : 2 - 8; लूक 9 : 28 - 36
खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।