38. येशूक इश्वासघातान धरून देण्यात येता
दरवर्साक, यहुदी वल्हांडण सण साजरो करीत. देवान मिसर देशातल्या गुलामगिरीतना शेकडो वर्सांपूर्वी तेंच्या पूर्वजांची कशी सुटका केल्यान, हेचो आनंद साजरो करूक यहुदी लॉक ह्यो सण पाळीत. येशूच्या प्रचार कार्याक सुरवात झाल्यापासना सुमारे तीन वर्सांनी येशून आपल्या शिष्यांका सांगितल्यान की यरुशलेमेत तेंच्याबरोबर वल्हांडण साजरो करायचो अशी तेची इच्छा आसा नी तेच्यानंतर तो थय मारलो जाणार हा असाव तेना सांगितल्यान.
येशूच्या शिष्यांपैकी यहूदा नावाचो येक शिष्य व्हतो. यहूदा ह्यो प्रेषितांच्या पैश्यांची पिशी सांभाळनारो खजिनदार व्हतो, पण तो पैशांचो लोभी असल्यामुळा मॉपदा तेच्यातना पैशे चोरीत आसायचो. येशू नी शिष्य यरुशलेमेत इल्यार, यहूदा धार्मिक पुढाऱ्यांका जावन भेटता नी पैशांच्या मोबदल्यात येशूक पकडून देवच्याविषय बोलता. तेका ठावक व्हता की यहुदी पुढारी येशू ह्यो मसीहा हा ह्या नाकारीत व्हते नी तेका मारुचो कट रची व्हते.
तेळाक महायाजक नी यहुदी पुढाऱ्यांनी मिळान, येशूचो इश्वासघात करूक यहूदाक चांदीची तीस नाणी दिल्यानी. संदेष्ट्यांनी सांगितलली भविष्यवाणी पूरी होवक ह्या सगळा काय झाला हा. यहूदा तेका सहमत झालो नी पैशे घेवन गेलो. त्यापासना तो येशूक धरून देवची वाट बघुक लागलो.
यरुशलेमेत, येशून आपल्या शिष्यांबरोबर वल्हांडण सण साजरो केल्यान. वल्हांडणाच्या जेवणा दरम्यान येशून भाकर घेवन ती मोडल्यान नी म्हटल्यान, "घेवा नी खावा. ह्या माझा शरीर हा, ता तुमच्यासाठी दिला जाता. माझ्या स्मरणार्थ ह्या करा." तसाच येशून म्हटल्यान की, तेचा शरीर तेंच्यासाठी बलिदान म्हणून देण्यात येयत.
मगे येशून येक पेलो घेवन म्हटल्यान, "हेच्यातना पिवा. ह्या माझ्या नव्या कराराचा रक्त हा. ता मॉपजणांच्या पापक्षमेसाठी वतला जाता हा. जितक्यांदा तुम्ही ह्या पितास, तितक्यांदा ह्या माझ्या स्मरणार्थ करा."
मगे येशून शिष्यांका म्हटल्यान, "तुमच्यापैकी येक माझो इश्वासघात करीत. तेळाक तेंका धक्को बसलो नी ते इचारुक लागले की, "असा कोण करीत?" येशून म्हटल्यान, "जेका मीया ही भाकरी मोडून देयन, तोच माझो इश्वासघात करीत." मगे तेना यहूदाक तो भाकरी मोडून दिल्यान.
यहूदान भाकरी घेतल्यार, सैतानान तेच्यात प्रवेश केल्यान. मगे येशूक पकडून देवक यहूदा थयना निघान यहुदी पुढाऱ्यांका मदत करूक गेलो. ती रात्रीची येळ व्हती.
जेवणानंतर, येशू आपल्या शिष्यांबरोबर जैतुनाच्या डोंगराकडे गेलो. येशून म्हटल्यान, "आज रात्री तुम्ही सगळे माका सोडून जातलास. असा लिवलला हा की, मीया मेंढपाळाक मारीन नी मेंढरांची दाणादाण करीन."
पेत्रान उत्तर दिल्यान, "जरी सगळ्यांनी तुका सोडल्यानी, तरी मीया तुका सोडूचय नाय!" तेळाक येशून पेत्राक म्हटल्यान, "सैतानान तुमचो सगळ्यांचो नाश करुचो ठरयल्यान हा, पण मीया तुमच्यासाठी प्रार्थना केल आसय. अशासाठी की तुमचो इश्वास डळमळता नये. तरीव आज रात्री, कोंबडो आरवाच्या आधी तुया माका तीन येळा नाकारशीत."
तेळाक पेत्रान येशूक म्हटल्यान, "माका मराचा जरी लागला, तरी मीया तुका नाकारुचय नाय!" बाकीच्या शिष्यांनीव तसाच म्हटल्यानी.
मगे येशू आपल्या शिष्यांका घेवन गेथशेमाने म्हटलल्या जागेर गेलो. शिष्यांनी परीक्षेत पडता नये म्हणान येशून तेंका प्रार्थना करूक सांगल्यान. मगे येशू स्वतः प्रार्थना करूक गेलो.
येशून तीन येळा प्रार्थना केल्यान, "हे पित्या, जर शक्य आसत, तर ह्यो दुःखसहनाचो पेलो माझ्यापासना लांब कर. पण लॉकांच्या पापक्षमेसाठी दुसरो मार्गच नसात, तर तुझी इच्छा पुरी होवंदे." येशू मॉप व्याकुळ झालो नी तेचो घाम रक्ताच्या थेंबासारखो झालो. देवान येक देवदूत पाठवन तेका शक्ती दिल्यान.
प्रार्थना संपवन प्रत्येक येळाक येशू शिष्यांकडे इल्यार शिष्य झोपलल्या अवस्थेत तेका आढळले. जेळाक तो तिसऱ्यांदा परातलो तेळाक येशून म्हटल्यान, "उठा! माझो इश्वासघात करणारो इलो हा."
यहूदा धार्मिक पुढारी, सैनिक नी येका मोठ्या लॉकांच्या घोळक्याबरोबर इलो. तेंनी आपल्याबरोबर तलवारी नी सोटे आणलल्यानी. यहूदान येशूजवळ येवन म्हटल्यान, "सलाम, गुरुजी!" नी तेचा चुंबन घेतल्यान. कोणाक पकडायचा ह्या यहुदी धर्मपुढाऱ्यांका समजासाठी ह्या याक चिन्ह व्हता. तेळाक येशून म्हटल्यान, "यहूदा, माझा चुंबन घेवन माझो इश्वासघात करतस काय?"
सैनिक येशूक पकडीत आसताना, पेत्रान त्यातल्या सैनिकाची तलवार काढल्यान नी महायाजकाच्या सेवकाचो कान कापल्यान. येशून म्हटल्यान, "तलवार बाजूक ठेव! मीया पित्याक माझ्या बचावासाठी देवदूतांचा सैन्य मागू शकतय. पण माका पित्याची आज्ञा पाळणा गरजेचा हा." मगे येशून त्या माणसाचो कान बरो केल्यान. येशूक अटक झाल्यार सगळे शिष्य पाळान गेले.
बायबलातली गोष्ट : मत्तय 26:14-56; मार्क 14 : 10-50; लूक 22 : 1-53; योहान 12:6; 18:1 - 11
खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।