39. येशूची चौकशी

39. येशूची चौकशी — चित्र 1

ह्या मध्यरात्रीचा समय व्हता. सैनिकांनी येशूची चौकशी करूक तेका महायाजकाच्या घराक घेवन गेले. पेत्र लांबूनच तेच्या पाठीमागना येयत व्हतो. ते जेळाक येशूक भुतूर घरात घेवन गेले, तेळाक पेत्र भायर थंडी आसल्यामुळा शेकीत बसलो.

39. येशूची चौकशी — चित्र 2

भुतूर घरात, यहुदी धर्मपुढारी येशूची चौकशी करीत व्हते. तेंनी येशूइरुद्ध मॉपशे खोटे साक्षीदार आणल्यानी व्हते. तरी तेंच्या साक्षीत काय मेळ बसना, म्हणान यहुदी पुढाऱ्यांका येशूचो गुन्हो सिद्ध करता इलो नाय. तेळाक येशू काय येक बोलाक नाय.

39. येशूची चौकशी — चित्र 3

शेवटाक, महायाजकान येशुकडे बघून इचारल्यान, "आमका सांग, की तुया मसीहा, जिवंत देवाचो झिल आसस?"

39. येशूची चौकशी — चित्र 4

येशून म्हटल्यान, "मीया आसय, नी तुम्ही माका पित्याच्या बाजूक बसललो नी स्वर्गातना येताना बघश्यात." तेळाक महायाजकान रागान आपले कपडे फाडल्यान नी बाकीच्या धार्मिक पुढाऱ्यांसमोर मोठ्यान म्हटल्यान, "आता आमका आणखीन पुराव्याची गरज नाया! तो देवाचो झिल आसा असा तेना म्हटल्यान ह्या तुम्ही स्वतः आयकलास. तुमचो निवाडो काय हा?"

39. येशूची चौकशी — चित्र 5

सगळ्या यहुदी पुढाऱ्यांनी महायाजकाक उत्तर दिल्यानी, "तो मरणदंडाक पात्र आसा!" मगे तेंनी येशूच्या डोळ्यार पट्टी बांधल्यानी, तेच्या तोंडार थुंकले, तेका मारल्यानी नी तेची मस्करी केल्यानी.

39. येशूची चौकशी — चित्र 6

पेत्र घराभायर वाट बघित व्हतो, तेळाक घरकाम करणाऱ्या येका बायन तेका म्हटल्यान, "तूव येशूबरोबर व्हतस!" पेत्रान नकार दिल्यान. मगे, दुसऱ्या येका बायन असाच म्हटल्यान नी पेत्रान परत येकदा नकार दिल्यान. शेवटाक, लॉकांनी म्हटल्यानी, "आमका ठावक हा की तुया येशूबरोबर व्हतस कारण तुम्ही दोघाव गालील प्रदेशातले आसास.

39. येशूची चौकशी — चित्र 7

तेळाक पेत्रान शपथ घेवन म्हटल्यान, "जर मीया ह्या माणसाक वळखत आसान तर देव माका शापित करो!" लगेच, कोंबडो आरावलो नी येशून पाठी वेळान पेत्राकडे बघल्यान.

39. येशूची चौकशी — चित्र 8

तेळाक पेत्र लांब जावन लय रडलो. दरम्यान, येशूक धरून देणाऱ्या यहुदान बघल्यान की, यहुदी धर्मपुढाऱ्यांनी येशूक मरणदंडाची शिक्षा दिल्यानी हा. तेळाक यहूदाक असा केल्याचो पस्तावो झालो नी तेना जावन आत्महत्या केल्यान.

39. येशूची चौकशी — चित्र 9

दुसऱ्या दिवशी सकाळीच, यहुदी पुढाऱ्यांनी येशूक रोमी सुभेदार पिलातासमोर आणल्यानी. तेंका आशा व्हती की पिलात येशूक दोषी ठरवन मरणदंडाची शिक्षा देयत. पिलातान येशूक इचारल्यान, "तुया यहुद्यांचो राजा आसस काय?"

39. येशूची चौकशी — चित्र 10

येशून उत्तर दिल्यान, "तुया असा म्हणतस, पण माझा राज्य ह्या पृथ्वीचा नाया. असा आसता तर माझे सेवक माझ्यासाठी लढले आसते. मीया ह्या पृथ्वीर देवाविषय सत्य सांगूक इलय. सत्यार प्रेम करणारो प्रत्येक जाण माझा आयकता." पिलातान इचारल्यान, "सत्य काय हा?"

39. येशूची चौकशी — चित्र 11

येशूबरोबर बोलल्यार पिलात भायर आसलल्या जमावाक बोललो, "माका ह्या माणसात कायच दोष आढळत नाया." पण यहुदी पुढारी नी लॉकांचो घोळको मोठ्यान वराडलो, "तेका वधस्तंभार खिळून टाका! हेच्यार पिलातान उत्तर दिल्यान, "तो निर्दोष आसा!" पण ते आणखीन मोठ्यान वरडाक लागले. तेळाक पिलातान म्हटल्यान. "तो निरपराध हा."

39. येशूची चौकशी — चित्र 12

जमाव आपल्याइरुद्ध बंड पुकारीत अशी पिलाताक भीती वाटली नी तेना आपल्या सैनिकांका येशूक वधस्तंभार खिळूची आज्ञा दिल्यान. रोमी सैनिकांनी येशूक फटके मारल्यानी, तेच्या आंगार येक राजकीय झगो घातल्यानी नी डोक्यार काट्यांचो मुकुट ठेवल्यानी. मगे ते तेची मस्करी करूक लागले, "बघा, ह्यो यहुद्यांचो राजा!"

बायबलातली गोष्ट : मत्तय 26: 57-27:26; मार्क 14 : 53 - 15: 15; लूक 22: 54 - 23 : 25; योहान 18 : 12 - 19:16

रीडर में पढ़ें

खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।