40. येशूक वधस्तंभार खिळतत
सैनिकांनी येशूची थट्टा उडवल्यार, ते तेका वधस्तंभार खिळे ठोकून मारूक घेवन गेले. ज्या वधस्तंभार तेका मारूचा व्हता तो वधस्तंभ तेंनी तेच्या खांद्यार दिल्यानी.
तेळाक 'कवटी' नाव आसलल्या जागेर ते तेका घेवन इले नी तेंनी येशूच्या हातात नी पायात खिळे ठोकल्यानी. पण येशून म्हटल्यान, "हे पित्या, हेंका क्षमा कर, कारण ते काय करतत ता तेंका कळत नाया." पिलातान तेंका आज्ञा केल्यान की, तेंनी 'यहुद्यांचो राजा' असा लिवलली पाटी वधस्तंभार येशूच्या डोक्याच्या वर लावायची.
येशूचे कपडे आपसात वाटून घेवक सैनिकांनी चिठये टाकल्यानी. जेळाक तेंनी ह्या केल्यानी, तेळाक ही भविष्यवाणी पुरी झाली, "तेंनी माझे कपडे आपसात वाटून घेवक चिठये टाकल्यानी."
येशूक दोन चोरांच्या मधोमध वधस्तंभार खिळण्यात इलला. तेंच्यातल्या येकान येशूची थट्टा केल्यान, पण दुसऱ्यान म्हटल्यान, "तुया देवाक भियानस नाय काय? आपण दोषी आसव, पण ह्यो माणूस निर्दोष आसा." तेळाक तेना येशूक म्हटल्यान, "तुझ्या राज्यात माझी आठवण ठेव." येशून तेका म्हटल्यान, "आजच तुया माझ्याबरोबर सुखलोकात आसशीत."
यहुदी पुढारी नी जमावातल्या बाकीच्या लॉकांनीव येशूची मस्करी केल्यानी. ते तेका बोलले, "जर तुया देवाचो झिल आसस तर वधस्तंभावरना खाली उतरान ये नी स्वतःचो बचाव कर! म्हणजे आम्ही तुझ्यार इश्वास ठेवचव."
तेळाक भर दुपारी देशभर आकाशात काळोख पडलो. दुपारपासना तीन वाजेपर्यात पृथ्वीर काळोख व्हतो.
तेळाक येशून मोठ्यान म्हटल्यान, "पूरा झाला! हे पित्या, मीया माझो आत्मो तुझ्या हातात सोपवतय." तेळाक तेना आपला डोक्या लववून प्राण सोडल्यान. जेळाक येशू मेलो तेळाक मोठो भूकंप झालो नी मंदिरातलो पडदो वरपासना खालपर्यात फाटान दुभागलो.
आपल्या मरणाद्वारे, येशून लॉकांका देवाकडे जावचो मार्ग खुलो करून दिल्यान. येशूर पहारो करणाऱ्या सैनिकान ह्या सगळा बघून म्हटल्यान, "खरोखर, ह्यो माणूस निष्पाप व्हतो. तो देवाचो झिल व्हतो.
तेळाक योसेफ नी निकदेम हे दोघे यहुदी पुढारी जेंनी येशू ह्यो मसीहा हा असो इश्वास ठेवल्यानी व्हतो, तेंनी पिलाताकडे जावन येशूचा शरीर मागल्यानी. तेंनी तेचा शरीर कपड्यात गुंडाळून खडकात खोदलेल्या येका कबरेत ठेवल्यानी. मगे तेंनी त्या कबरेच्या तोंडार येक मोठो धोंडो उभो करून कबरेचा तोंड बंद केल्यानी.
बायबलातली गोष्ट : मत्तय 27:27-61; मार्क 15:16-47; लूक 23:26-56; योहान 19:17-42
खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।