42. येशूचा स्वर्गरोहण (येशू परत स्वर्गात जाता)
येशू मेलल्यातना ज्या दिवशी उठलो, त्या दिवशी तेचे दोन शिष्य जवळच्या येका गावात जाय व्हते. ते चलत आसताना, येशूविषय जा घडला व्हता त्याविषय बोलत व्हते. तेंनी येशू ह्यो मसीहा हा असो इश्वास ठेयल्यानी व्हतो, पण येशूक मारण्यात इलला. आता ते बायका म्हणत व्हते की तो परत जिवंत झालो हा. आता कशार इश्वास ठेवायचो ह्या तेंका कळत नाय व्हता.
येशू तेंच्याजवळ इलो नी तेंच्याबरोबर चलाक लागलो, पण तेंनी तेका वळखाक नाय. ते खेच्याविषय बोला व्हते ता तेना तेंका इचारल्यान नी तेंनी तेका काय दिवसापूर्वी येशूविषय घडलले उल्लेखनीय गोष्टी सांगितल्यानी. तेंका वाटला की ते येका अनोळखी प्रवाशाबरोबर बोलतत, जेका यरुशलेमेत घडलले गोष्टी म्हायत नायत, तेच्याबरोबर बोलतत.
तेळाक येशून तेंका देवाच्या वचनात मसीहाविषय काय सांगितलला हा हेचो उलगडो करून सांगितल्यान. तेना तेंका आठवण करून दिल्यान की संदेष्ट्यांनी सांगितल्यानी व्हता की, मसीहा दुःख सोशीत, तेका ठार मारतीत, पण तिसऱ्या दिवसाक तो परत उठात. जेळाक ते दोघा जय मुक्काम करुचो व्हतो थय पोचले, तेळाक संध्याकाळ व्हयत इलली.
त्या दोघांनीव येशूक आपल्याबरोबर मुक्काम करुचो आग्रह केल्यानी नी तो तेंच्याबरोबर ऱ्हवक भुतूर गेलो. ते संध्याकाळच्या जेवणाक बसलले आसताना, येशून भाकरी घेवन देवाचो धन्यवाद केल्यान नी ती मोडल्यान. अचानक तो येशू हा ह्या तेंनी वळाखल्यानी. पण तेळाक, येशू तेंच्यापासना अंतर्धान पावलो.
ते दोघे येकमेकांका म्हणाक लागले, "तो येशू व्हतो! नी म्हणानच तो देवाचा वचन आमका उलगडो करून सांगत आसताना आपला अंतःकरण आतल्याआत उकळत व्हता!" तेळाक लगेच, ते यरुशलेमेत परातले. तेंनी येवन शिष्यांका सांगल्यानी की, "येशू जिवंत झालो हा! आम्ही तेका बघितलाव!"
शिष्य ह्या बोलत आसतानाच, येशून त्या खोलयेत स्वतःक प्रकट केल्यान नी म्हटल्यान, "तुमका शांति असो!" शिष्यांका वाटला की ता भूत हा, पण येशून म्हटल्यान, "तुम्ही भयभीत होवन शंका कित्याक घेतास? माझ्या हाताकडे नी पायाकडे बघा. जसा माझा शरीर आसा तसा भूतांका नसता." तो भूत नाया ह्या सिद्ध करूक तेना तेंका खावक काय आसा काय ता इचारल्यान. तेंनी तेका शिजवललो मासो दिल्यानी नी तेना तो खाल्ल्यान.
येशून म्हटल्यान, "मीया तुमका सांगितललय की माझ्याविषय देवाच्या वचनात लिवलले सगळे गोष्टी पूरे होणा गरजेचा हा." मगे तेना तेंची अंतःकरणा उघडल्यान, तेळाक तेंका देवाचा वचन कळला. तेना म्हटल्यान, "मॉप वर्सां आधी असा लिवलला हा की, मसीहा दुःख सहन करीत, तेका मारतीत नी तिसऱ्या दिवसाक तो मरणातना उठात."
"धर्मशास्त्रात ह्याव लिवलला आसा की, माझे शिष्य पापांची क्षमा होवक पाश्चात्तापाची घोषणा करतीत. ते यरुशलेमेपासना ह्या संदेशाक सुरवात करतीत, मगे सगळ्या ठिकाणच्या सगळ्या लॉकांकडे ह्यो संदेश घेवन जातीत. तुम्ही ह्या गोष्टींचे साक्षीदार आसास."
पुढच्या चाळीस दिवसात, येशू मॉप येळाक शिष्यांका प्रकट झालो. येकदा तर तो ५००हून अधिक लॉकांका येकाच येळेक प्रकट झालो. तेना आपल्या शिष्यांका आपण जिवंत असल्याची खात्री मॉप प्रकारान दिल्यान नी तेंका देवाच्या राज्याविषय शिकवण दिल्यान.
येशून आपल्या शिष्यांका म्हटल्यान, "स्वर्गात नी पृथ्वीर सगळे अधिकार माका देण्यात इले आसत. म्हणान, तुम्ही जावा नी सगळ्या राष्ट्रांतल्या लॉकांका शिष्य बनवा नी बापुस, झिल नी पवित्र आत्म्याच्या नावान तेंका बाप्तिस्मो देवा नी मीया आज्ञा केलले सगळे गोष्टी तेंका पाळूक शिकवा. नी आठवण ठेवा की मीया कायमचो तुमच्याबरोबर आसय."
येशूच्या पुनरुत्थानानंतर चाळीस दिवसानी येशून शिष्यांका सांगितल्यान, "जोपर्यात माझो बापुस तुमका सामर्थ्य देणारो पवित्र आत्मो तुमच्यार पाठयत नाय, तोपर्यात यरुशलेम सोडून जाव नको." मगे येशू स्वर्गात गेलो नी ढगांनी तेका तेंच्या नजरेआड केल्यान. सगळ्या गोष्टीर अधिकार चालवक येशू देवाच्या उजव्या बाजूक बसलो हा.
बायबलातली गोष्ट : मत्तय 28:16-20; मार्क 16:12-20; लूक 24:13-53; योहान 20:19-23; प्रेषितांची कृत्ये 1:1-11
खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।