43. मंडळीची सुरवात
येशू स्वर्गात गेल्यार, येशून आज्ञा दिल्याप्रमाण शिष्य यरुशलेमेतच ऱ्हवले. थयले इश्वासणारे प्रार्थना करूक वारंवार येकत्र येवक लागले.
दरवर्साक, वल्हांडणानंतर ५० दिवसानी, यहुदी लॉक पेंटेकॉस्ट नावाचो महत्वाचो दिवस साजरो करीत. पेंटेकॉस्ट ह्यो यहुदी लॉकांच्या हंगामाचो सण व्हतो. जगातले सगळे यहुदी लॉक यरुशलेमेत येवन पेंटेकॉस्ट साजरो करीत. तेळाक येशूचा स्वर्गरोहण झाल्यार येक आठवड्यान पेंटेकॉस्ट इलो व्हतो.
जेळाक सगळे इश्वासणारे येकत्र जमलले, येकायेकी ते बसलले ती खोली सोसाट्याच्या वाऱ्यासारख्या आवाजान भरान गेली. तेळाक आगीच्या ज्वालेसारखे जिभे तेंका सगळ्या इश्वासणाऱ्यांच्या डोक्यार दिसले. ते सगळे पवित्र आत्म्यान भरान गेले नी येगयेगळ्या भाषेत बोलाक लागले.
यरूशलेमेतल्या लॉकांनी जेळाक ह्यो आवाज आयकल्यानी तेळाक ह्या काय हा ता बघूक इले. जेळाक लॉकांनी इश्वासणाऱ्यांका देवाची आश्चर्यकामा प्रकट करताना नी तेंच्याच मातृभाषेत बोलताना आयकल्यानी तेळाक लॉकांका लय आश्चर्य वाटला.
काय लॉकांका वाटला की, इश्वासणारे दारू पिवन मस्त झाले हत. पण पेत्रान उभो ऱ्हवान तेंका म्हटल्यान, "माझा बोलणा आयका! ही माणसा दारू पिवन मस्त झाली नायत! ह्याविषय योएल संदेष्ट्यान केलली भविष्यवाणी पूरी व्हता हा, देवान म्हटल्यान हा, "शेवटच्या काळात मीया आपल्या आत्म्याचो वर्षाव करीन.
"अहो इस्राएली लॉकांनो, येशून देवाच्या शक्तीन मॉप चिन्हा नी अद्भूत कार्या केल्यान, जी तुम्ही स्वतः डोळ्यांनी बघलास नी तुमका ती म्हायत आसत. पण तुम्ही तेका वधस्तंभार खिळलास."
"जरी येशू मरण पावललो, तरी देवान तेका मेलल्यातना परत उठवल्यान. ह्या घटनेन ही भविष्यवाणी पूरी व्हता, 'तुया आपल्या पवित्राक कबरेत कुजाक देवचस नाय.' आम्ही ह्या गोष्टीचे साक्षीदार आसव की देवान येशूक मरणातना परत उठवल्यान हा."
येशू आता आपल्या देवपित्याच्या उजव्या बाजूक उंचवललो हा नी येशून अभिवचन दिल्याप्रमाण तेना आमच्यासाठी पवित्र आत्मो पाठवल्यान हा. आता जा तुम्ही बघतास नी आयकतास, ते सगळे गोष्टी पवित्र आत्मो करता हा.
"तुम्ही येशू ह्या माणसाक, वधस्तंभार खिळलास. पण आता तुमका कळांदेत की, जेका तुम्ही वधस्तंभार खिळून मारलास, तेका देवान प्रभू नी ख्रिस्त असो करून ठेवललो हा!"
पेत्राचा भाषण आयकनाऱ्यांच्या मनाक टोचला. म्हणान तेंनी पेत्र नी बाकीच्या प्रेषितांका इचारल्यानी, "बंधुजनांनो, आम्ही आता काय करायचा?"
पेत्रान तेंका म्हटल्यान, "तुमच्यापैकी प्रत्येकान आपापल्या पापांचो पश्चात्ताप करून येशू ख्रिस्ताच्या नावात बाप्तिस्मो घेवा, म्हणजे देव तुमका तुमच्या पापांची क्षमा करीत. मगे तो तुमका पवित्र आत्म्याचा दानव देयत."
तेळाक सुमारे ३००० लॉकांनी पेत्राच्या बोलण्यार इश्वास ठेवल्यानी नी ते येशूचे शिष्य झाले. तेंनी बाप्तिस्मो घेतल्यानी नी यरूशलेमेच्या मंडळीत सामील झाले.
शिष्य प्रेषितांच्या शिक्षणात, सहवासात, भाकरी मोडण्यात नी इतरांबरोबर प्रार्थना करण्यात तत्पर आसायचे. ते आनंदान येकत्र देवाची स्तुति करीत नी तेंचा सगळा काय सामाईक व्हता. सगळे लोक तेंका प्रसन्न आसायचे. प्रत्येक दिवसाक तेंच्यात नईन इश्वासणाऱ्यांची भर पडा व्हती.
बायबलातली गोष्ट : प्रेषित 2
खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।