44. पेत्र नी योहान येका भिकाऱ्याक बरे करतत
येके दिवशी पेत्र नी योहान मंदिरात जायत व्हते. ते मंदिराच्या प्रवेशद्वाराकडे जायत आसताना, तेंनी येक लंगडो भिकारी भीक मागित आसताना बघल्यानी.
पेत्रान त्या पांगळ्या माणसाकडे बघून म्हटल्यान, "तुका देवक माझ्याकडे पैशे नायत. पण माझ्याकडे जा हा ता मीया तुका दितय. येशूच्या नावात उठ नी चलाक लाग!"
लगेच तो पांगळो माणूस बरो झालो, तो चलाक लागलो नी तो उडये मारीत देवाची स्तुति करूक लागलो. मंदिराच्या खळ्यातल्या लॉकांनी तेका बघून आश्चर्य केल्यानी.
त्या बरो झालल्या माणसाक बघुक लॉकांनी तेच्याभवती गर्दी केल्यानी. पेत्रान तेंका म्हटल्यान, "ह्यो माणूस बरो झाललो बघून तुम्ही आश्चर्य कित्याक करतास?" आम्ही आमच्या शक्तीन किंवा आमच्या चांगुलपणान तेका बरे केलव नाय. तर येशूच्या रक्तान नी देवान दिलल्या इश्वासानच ह्यो माणूस बरो झालो हा."
"तुम्ही रोमी सम्राटाक येशूक ठार मारूक सांगितलास. तुम्ही जीवनदात्याक ठार मारलास, पण देवान तेका मेलल्यातना परत उठवल्यान. जरी तुमका काय करीत व्हतास ता कळला नाय, तरी देवान तुमच्याकडना मसीहा दुःख सोशीत नी मरात ही भविष्यवाणी पूरी करून घितल्यान हा. ह्यामुळाक, आता पश्चात्ताप करा नी देवाकडे वळा म्हणजे तुमची पापा धुतली जातली."
मंदिरातले पुढारी पेत्र नी योहान हेंचा बोलणा आयकान संतापले. म्हणान तेंनी तेंका धरून तुरुंगात टाकल्यानी. पण मॉप लॉकांनी पेत्राच्या वचनार इश्वास ठेयल्यानी नी आता इश्वासणाऱ्यांची संख्या वाढान सुमारे ५००० झालली.
दुसऱ्या दिवसाक, यहुदी पुढाऱ्यांनी पेत्राक नी योहानाक महायाजकासमोर नी बाकीच्या धर्मपुढाऱ्यांसमोर उभे केल्यानी. तेंनी पेत्र नी योहान हेंका इचारल्यानी, "तुम्ही खयच्या शक्तीन ह्या पांगळ्या माणसाक बरो केलास?"
पेत्रान तेंका म्हटल्यान, "ह्यो माणूस येशू ख्रिस्ताच्या नावात बरो होवन तुमच्यापुढे उभो हा. तुम्ही येशूक वधस्तंभार खिळलास, पण देवान तेका परत जिवंत केल्यान! तुम्ही तेका नाकारलास, पण येशू ख्रिस्ताच्या शक्तीशिवाय तारणाचो दुसरो मार्ग नाया!"
ह्या आयकान धार्मिक पुढाऱ्यांका आश्चर्याचो धक्को बसलो, कारण पेत्र नी योहान सामान्य नी अडाणी माणसा आसतानाव तेंच्यासमोर मोठ्या धाडसान बोला व्हते. पण ते येशूच्या सहवासात व्हते ह्या तेंनी वळाखल्यानी. मगे तेंनी पेत्राक नी योहानाक धमकावल्यानी नी जावक दिल्यानी.
बायबलातली गोष्ट : प्रेषित 3:1-4:22
खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।