47. फिलिपै नगरात पौल नी सीला

47. फिलिपै नगरात पौल नी सीला — चित्र 1

शौल सगळ्या रोमन साम्राज्यातना प्रवास करीत आसताना, तो आपल्या "पौल" ह्या रोमन नावाचो उपयोग करूक लागलो. येक दिवसाक पौल नी तेचो मित्र सीला हे फिलिप्पै नगरात येशूची सुवार्ता सांगूक गेले. शहराच्या वेशीभायर नदयेच्या काठार प्रार्थनेक येकत्र इलल्या लॉकांकडे ते गेले. थय तेंका लुदिया नावाची येक व्यापारी स्त्री भेटली. तिचा देवार प्रेम व्हता नी ती देवाची भक्ती करणारी व्हती.

47. फिलिपै नगरात पौल नी सीला — चित्र 2

देवान लुदियाचा अंतःकरण उघडल्यान नी तिना येशूविषयच्या संदेशार इश्वास ठेयल्यान. मगे तिना आपल्या कुटुंबियांबरोबर बाप्तिस्मो घितल्यान. तिना पौल नी सीला हेंका आपल्या घराक बोलवल्यान, तेळाक ते तिच्या कुटुंबाबरोबर ऱ्हवले.

47. फिलिपै नगरात पौल नी सीला — चित्र 3

पौल नी सीला प्रार्थनेच्या जागेर लॉकांका वारंवार भेटले. दररोज ते त्या जागेर आसताना, येक दासी नी दुष्टात्म्यान ग्रासलला पॉर तेंच्या पाठना चलाक लागला. त्या दुष्टात्म्याच्या आधारान ता लॉकांचा भविष्य सांगित आसायचा, अशाप्रकारान भविष्य सांगून ता आपल्या धन्यांका मॉप मिळकत करून देयत आसायची.

47. फिलिपै नगरात पौल नी सीला — चित्र 4

ते रस्त्यान चलत आसताना ता गुलाम पॉर वरडत ऱ्हवला, "हे माणूस परात्पर देवाचे दास आसत. ते तुमका तारणाचो मार्ग सांगतत!" तेना असा मॉप येळा केल्यान म्हणान पौलाक त्रास झालो.

47. फिलिपै नगरात पौल नी सीला — चित्र 5

शेवटाक येके दिवशी, ता पॉर वरडाक लागला, पौलान तेच्याकडे वळान तेच्यात आसलल्या दुष्टआत्म्याक म्हटल्यान, "येशू ख्रिस्ताच्या नावान मीया तुका आज्ञा करतय की, तुया हेच्यातना निघान जा." नी लगेच तो दुष्टात्मो तेका सोडून निघान गेलो.

47. फिलिपै नगरात पौल नी सीला — चित्र 6

ह्या बघून त्या पॉराच्या धन्यांका लय राग इलो! तेंच्या लक्षात इला की दुष्टात्म्याशिवाय ता पॉर लोकांचा भविष्य सांगू शकणार नाय. हेचो अर्थ तेना लॉकांका तेंचा भविष्य सांगायचा म्हणान लॉक आता तिच्या मालकांका पैशे देणार नाय व्हते.

47. फिलिपै नगरात पौल नी सीला — चित्र 7

तेळाक ह्या पॉराच्या धन्यांनी पौल नी सीला हेंका रोमन अधिकाऱ्याकडे न्हील्यानी नी तेंनी तेंका मारहाण केल्यानी नी तुरुंगात टाकल्यानी.

47. फिलिपै नगरात पौल नी सीला — चित्र 8

तेंनी पौल नी सीला हेंका तुरुंगाच्या येकदम भुतूरल्या जागेर ठेवल्यानी नी तेंचे पाय खोड्यांतूर अडकवल्यानी. तरीव मध्यरात्रीक ते देवाची स्तुति करीत व्हते नी गाणी गायत व्हते.

47. फिलिपै नगरात पौल नी सीला — चित्र 9

अचानक, त्या जागेर येक मोठो भूकंप झालो! तेळाक तुरुंगाचे सगळे दरवाजे आपोआप उघाडले नी कैद्यांचे साखळदंडव तुटान पडले.

47. फिलिपै नगरात पौल नी सीला — चित्र 10

तेळाक तुरुंगाचो अधिकारी जागो झालो, नी जेळाक तेना तुरुंगाचे दरवाजे उघडे बघितल्यान तेळाक तो लय घाबारलो! तेका वाटला की सगळे कैदी पळान गेले आसतले, म्हणान तो आत्महत्या करणार व्हतो. (तेका म्हायत व्हता जर कैदी पळान गेले तर रोमी अधिकारी तेका ठार मारतले.) पण पौलान तेका आरडान म्हटल्यान, "थांब! स्वतःक इजा करून घेव नको, कारण आम्ही सगळे हयच आसव."

47. फिलिपै नगरात पौल नी सीला — चित्र 11

तुरुंगाचो अधिकारी पौल नी सीलाकडे जायत आसताना थरथर कापत व्हतो. तेना म्हटल्यान, "माझा तारण होवक मीया काय करू?" पौलान उत्तर दिल्यान, "प्रभू येशूर इश्वास ठेय म्हणजे तुझा नी तुझ्या घराण्याचा तारण व्हयत." तेळाक त्या अधिकाऱ्यान पौल नी सीला हेंका आपल्या घराक घेवन गेलो नी तेना तेंचे जखम धुतल्यान. पौलान तेच्या घरातल्या सगळ्या लॉकांका येशूची सुवार्ता सांगितल्यान.

47. फिलिपै नगरात पौल नी सीला — चित्र 12

तुरुंगाधिकाऱ्यान नी तेच्या सगळ्या कुटुंबान येशूर इश्वास ठेवन बाप्तिस्मो घितल्यानी. तेळाक तुरुंगाधिकाऱ्यान पौल नी सीलाक जेवान दिल्यान नी तेंनी येकत्र मिळान आनंद केल्यानी.

47. फिलिपै नगरात पौल नी सीला — चित्र 13

दुसऱ्या दिवसाक, शहराच्या अधिकाऱ्यांनी पौल नी सीला हेंची सुटका केल्यानी नी फिलिपै शहर सोडून जावक सांगितल्यानी. तेळाक पौल नी सीला हेंनी लुदिया नी इतर बंधूंका भेट दिल्यानी नी मगे तेनी ता शहर सोडल्यानी. येशूविषय सुवार्ता पसरत गेली नी मंडळीची वाढ व्हयत गेली.

47. फिलिपै नगरात पौल नी सीला — चित्र 14

पौल नी इतर ख्रिस्ती पुढारी येशूची सुवार्ता सांगित नी शिक्षण देयत मॉप शहरातना प्रवास करीत गेले. तेंनी मॉपशी पत्राव लिवल्यानी नी मंडळीतल्या इश्वासणाऱ्यांका प्रोत्साहन नी शिक्षण दिल्यानी. तेंच्यापैकी काय पत्रा बायबलातली पुस्तका झाली.

बायबलातली गोष्ट : प्रेषित 16:11-40

रीडर में पढ़ें

खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।