31. येशू पाण्यावर चालतो
तेव्हा लोकांना घरी पाठवून दिल्यानंतर येशूने शिष्यांना जहाजी मध्ये बसून पलीकडे जाण्यास सांगितले. सर्वलोक निघून गेल्यानंतर येशू डोंगरावर प्रार्थना करण्यासाठी गेला. येशू तेथे एकटा होता, आणि रात्री खूप उशिरापर्यंत तो प्रार्थना करत राहिला.
तोपर्यंत, शिष्य जहाजाला वल्ली मारत राहिले. पण खूप रात्र झाली होती. ते समुद्राच्या मध्यभागी पोहचले होते. फार हाल होत होते त्यांचे वल्ली मारता मारता कारण वारा त्यांच्या विरुद्ध वाहत होता.
तेव्हा येशू प्रार्थना झाल्यावर शिष्यांकडे आला. तो समुद्रावरून पाण्यावर चालत होता. व त्यांच्या कडे येत होता .
येशूला पाहून शिष्य खूप घाबरून गेले, कारण त्यांना वाटले की ते एका भूतला बघत आहे. येशूला माहिती होते की ते घाबरीन गेले आहे.म्हणून तो त्यांना म्हणाला, “ घाबरू नका मी आहे “
तेव्हा येशूला बघून, “पेत्र म्हणाला प्रभुजी जर तुम्ही आहा, तर मला पाण्यावर चालण्याची आज्ञा द्या. “येशू पेत्रास म्हणाला” ये
म्हणून पेत्र जहाजेमधून उतरून येशूकडे पाण्यावर चालू लागला. पण थोडे अंतर चालल्यानंतर, त्याने आपल लक्ष येशू कडून दुसरीकडे केले व समुद्राच्या लाटा व वाऱ्याकडे बघु लागला.
तेव्हा पेत्राला भीती वाटली व तो पाण्यात बुडू लागला. तो मोठ्याने ओरडला, “प्रभुजी, मला वाचवा येशू लगेच त्याच्यापर्यंत गेला व त्याला बुडण्याच्या आधी पकडले. मग तो पेत्रास म्हणाला, “ अरे अल्पविश्वास माणसा, तु संशय का धरतोस ?
जेव्हा पेत्र आणि येशू दोघे जाहाजे मध्ये आले, तेव्हा लगेच वारा शांत झाला आणि पण शांत झाले. हे बघून शिष्यांना खूप नवल झाले. ते सर्व येशूच्या पाया पडले व म्हणले, “ तु खरोखर देवाचा पुत्र आहे “
बायबल कथा:मत्तय 14 : 22 - 33; मार्क 6 : 45 - 52; योहान 6 : 16 - 21
खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।