32. येशू एका भूतग्रस्त मनुष्यास व आजारी स्त्रीस बरे करितो

32. येशू एका भूतग्रस्त मनुष्यास व आजारी स्त्रीस बरे करितो — चित्र 1

एका दिवशी येशू आणि त्याचे शिष्य जहाजे मध्ये बसून समुद्राच्या पलीकडे गरसेकर राहात असलेल्या ठिकाणी गेले.

32. येशू एका भूतग्रस्त मनुष्यास व आजारी स्त्रीस बरे करितो — चित्र 2

त्या आवारात पलीकडे गेल्यावर एक भूत ग्रस्त माणूस येशू कडे पळत आला.

32. येशू एका भूतग्रस्त मनुष्यास व आजारी स्त्रीस बरे करितो — चित्र 3

हा माणूस एव्हडा शक्तिशाली होता की कोणताच माणूस त्याला ताब्यात करू शकत नवता. लोकांनी त्याचे हाथ व पाय साखळीने बांधलेले होते. पण त्या साखळ्या तो तोडून टाकत होता.

32. येशू एका भूतग्रस्त मनुष्यास व आजारी स्त्रीस बरे करितो — चित्र 4

तो माणूस कबरांमध्ये राहत होता. तो रात्रंदिवस मोठ्याने ओरडत होता. तो अंगावर कपडे घालत नव्हता व आपले अंग दगडाने ठेचून घेत होता.

32. येशू एका भूतग्रस्त मनुष्यास व आजारी स्त्रीस बरे करितो — चित्र 5

जेव्हा तो माणूस येशूकडे आला, तेव्हा येशू जवळ येऊन गुढगे टेकले व येशू त्या दुष्ट आत्म्याला म्हणाला, “ ह्या माणसातून बाहेर निघ “

32. येशू एका भूतग्रस्त मनुष्यास व आजारी स्त्रीस बरे करितो — चित्र 6

भूतग्रस्त माणूस मोठ्याने ओरडला, परात्पर देवाच्या मुला येशू, तु आमच्या मध्ये का पडतोस ? कृपा करून मला त्रास देऊ नका “ तेव्हा येशू त्या दुष्ट आत्म्याला म्हणाला ( भूताला ) विचारले, “ तुझे नाव काय ? तो म्हणाला माझे नाव सैन्य आहे. कारण आम्ही पुष्कळ आहोत.

32. येशू एका भूतग्रस्त मनुष्यास व आजारी स्त्रीस बरे करितो — चित्र 7

ते दुष्टात्मे येशूला विनंती करू लागली, की कृपया आम्हाला या प्रांतातून घालवून देऊ नको, शेजारच्या टेकडीवर डुकरांचा एक कळप चारत होता. म्हणून, दुष्ट आत्म्यांनी विनंती केली की आम्हाला त्या दुकारांमध्ये पाठवा, येशू म्हणाला जा “

32. येशू एका भूतग्रस्त मनुष्यास व आजारी स्त्रीस बरे करितो — चित्र 8

तेव्हा दुष्टात्मे त्या माणसातून निघून डुकरांच्या कळपात शिरले. तेव्हा ते डुकरे कड्यावरून खाली पळत गेली व समुद्रात पडली व डुबून मरण पावली. त्या कळपात जवळपास २००० डुकरे होती.

32. येशू एका भूतग्रस्त मनुष्यास व आजारी स्त्रीस बरे करितो — चित्र 9

हे बघून डुकरे पाळणारे पळत जाऊन गावात गेले व त्यांनी झालेला हा सर्व प्रकार व येशूने काय काय केले. हे प्रत्येकाला सांगितले. तेव्हा गावातील लोकांनी येऊन त्या भूत ग्रास्ताला पहिले. तो शांत होता. व त्याच्या अंगावर कपडे होते. व तोही आपल्या सारखा सर्वसाधारण वागत आहे असे त्यांनी पहिले.

32. येशू एका भूतग्रस्त मनुष्यास व आजारी स्त्रीस बरे करितो — चित्र 10

हे बघून लोक फार घाबरले व त्यांनी येशूला त्या गावाला सोडून जाण्यास सांगितले. तेव्हा येशू जहाजमध्ये बसून जाण्यासाठी तयार झाला. पहिले भूतग्रस्त असलेला माणूस येशूच्या बरोबर येण्यासाठी विनंती करू लागला.

32. येशू एका भूतग्रस्त मनुष्यास व आजारी स्त्रीस बरे करितो — चित्र 11

पण येशू त्याला म्हणाला, “नाही तु आपल्या घरी जा व आपल्या मित्राना व परिवाराला सर्व सांग की देवाने तुझ्यासाठी काय केले व तुझ्यावर कशी दया दाखवली.

32. येशू एका भूतग्रस्त मनुष्यास व आजारी स्त्रीस बरे करितो — चित्र 12

तेव्हा तो माणूस निघाला व देवाने त्याच्या साठी काय केले आहे याची साक्ष तो प्रत्येकाला सांगायला लागला. हे सर्व ऐकणारा प्रत्येक माणूस नवल करत होता व थक्क झाला.

32. येशू एका भूतग्रस्त मनुष्यास व आजारी स्त्रीस बरे करितो — चित्र 13

येशू त्या नंतर पलीकडे परत आला. तो तेथे पोहोचल्यावर, लोकांची मोठी गर्दी त्याच्या आजूबाजूला झाली. व ते त्याच्यावर पडायला लागले. त्या लोकांमध्ये बारा वर्ष पासून रक्तस्रावापासून पिडलेली असलेली बाई होती. तिने आपल सर्व काही वैद्याला लावले होते तरी पण ती बरी झाली नवती, तर तिची परिस्थिती अझून नाजूक झाली होती.

32. येशू एका भूतग्रस्त मनुष्यास व आजारी स्त्रीस बरे करितो — चित्र 14

तिने ऐकले होते की येशूने अनेक रोग्यांना बरे केले होते. आणि ती म्हणत होती, “ मला विश्वास आहे की मी केवळ येशूच्या कपड्याला स्पर्श केला, तरीपण मी बरी होईल. म्हणून तिने येशूच्या मागे जाऊन त्याच्या कपड्याला स्पर्श केला. तिने कपड्यला स्पर्श करताच तिचा रक्त सराव थांबला.

32. येशू एका भूतग्रस्त मनुष्यास व आजारी स्त्रीस बरे करितो — चित्र 15

ताबडतोब, येशूला समजले की त्याचा शरीरातून शक्ती निघाकी आहे. म्हणून त्याने मागे वळून पाहिले व म्हंटले, “ मला कोण स्पर्श केला ?”

32. येशू एका भूतग्रस्त मनुष्यास व आजारी स्त्रीस बरे करितो — चित्र 16

शिष्यांनी येशूला सांगितले, “लोकांची इतकी गर्दी आहे व ते तुम्हांला चेंगरीत आहे. तर तुम्ही कसकाय म्हणता, “ की मला कोणी स्पर्श केला ? त्या बाईने घाबरत घाबरत येशू पुढे जाऊन म्हणाली, मग तिने काय केले व ती कसकाय बरी झाली ते त्याला सांगितले. येशू तिला म्हणाला, “ तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. शांतीने जा “

बायबल कथा :मत्तय 8: 28 - 34; 9 : 20 - 22; मार्क 5 : 1 - 20; 5 : 24ब - 34; लूक 8 : 26 - 39; 8 : 42ब - 48

रीडर में पढ़ें

खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।