33. पेरणी करणा-याची गोष्ट
एक दिवशी समुद्रकिनाऱ्या जवळ येशू एका मोठ्या लोक जमावाला उपदेश देत होता. पुष्कळ लोक त्याचे ऐकण्यासाठी तेथे जमले तेव्हा येशू एका जहाजीत बसला व ती जहाज पाण्यामध्ये थोडी ढकला, यासाठी की त्याला त्यांच्याशी बोलण्यास भरपूर जागा मिळावी. तो त्या छोट्याशा जहाजी मधून लोकांना उपदेश करू लागला.
येशूने त्यांना ही गोष्ट सांगितली. “एक शेतकरी आपले बी पेरण्यासाठी निघाला. तो हाताने बी पेरत असतानी, काही बी वाटेवर पडले, व आकाशातील पक्ष्यांनी ते बी खाऊन टाकले.
“काही बी खडकाळ भागात पडले, त्या ठिकाणी खूपच कमी माती होती. खडकाळीवर ते बी लगेच उगवले, पण माती नसल्यामुळे त्याच्या मुळे त्याची मूळ खोल पर्यन्त जाऊ शकली नाही. व जेव्हा सुर्य वर आला त्याच्या उष्णतेने ते जाळून गेले.”
“परत काहीकाही बी काटेरी झाडांमध्ये पडले. ते बी चांगले वाढू लागले, पण त्या काटेरी झाडांनी त्याला वाढू दिले नाही.त्यामुळे काटेरी झाडांमध्ये पडलेले बी वाढू शकले नाही. व त्यास फळ आले नाही.”
“काही बी चांगल्या जमिनीत पडले. ते बी उगवले व वाढले त्याला पिक आले 30, 60 तर 100 पट फळ आले. ज्याला ऐकावयास कान आहे तो एको “
हा दाखला त्यांना समजला नाही, म्हणून येशूने त्यांना समजावून सांगितले. “बी म्हणजे देवाचे वचनआहे. वाटेवरची जमीन म्हणजे असा माणूस की जो देवाचे ऐकतो पण समजून घेत नाही. आणि सैतान येऊन ते मनातून काढून टाकतो.”
“खडकाळ जमीन म्हणजे असा माणूस की जो देवाचे वचन ऐकतो आणि आनंदाने घेतो. पण कष्ट व छळ झाल्यावर लगेच अडखळतो.”
“काटेरी जमीन म्हणजे जो देवाचे वचन ऐकतो, पण काही काळानंतर संसाराची चिंता काळजी, श्रीमंती आणि जगाचे सुख विलास यामुळे त्याचे देवाविषयी प्रेम व आदर कमी होते. याचा परिणाम म्हणून, त्याने ऐकलेले वचन बिनकामाचे ठरते.”
“पण चांगली जमीन म्हणजे, जो माणूस देवाचे वचन ऐकून त्याच्यावर विश्वास ठेवतो, आणि चांगले फळ देतो.”
बायबल कथा :मत्तय 13 :1 -8; 18-23; मार्क 4 : 1 - 8 ; 13 - 20; लूक 8 : 4 - 15
खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।