34. येशू अनेक गोष्टी शिकवितो
येशूने देवाच्या राज्य विषयी भरपूर गोष्टी सांगितल्या, उदा : “देवाचे राज्य मोहरीच्या दाण्यासारखे आहे जे कोणी मांसाने आपल्या शेतात लावले. तुम्हांला माहिती आहे. मोहरीचा दाणा हा सर्व बी मध्ये ;लहान आहे.
पण जेव्हा हा मोहोरीचा दाणा उगवतो तेव्हा बागेमधील सर्व झाडवून ते झाड अगदी मोढे होते. व खूप मोठे होते. की आकाशातील पक्षी त्यावर येऊन आपले घरटे बांधतात व राहतात.
येशूने अझून एक गोष्ट सांगितली, देवाचे राज्य खामिरासारखे आहे जे एका बाईने पिठामध्ये घातले व संपूर्ण पीठ फुगून गेले.
“देवाचे राज्य शेतामध्ये कोणी माणसाने लपवलेल्या गुप्त खाजीण्यासारखे आहे. कोण्या दुसऱ्या माणसाला ते सापडले व त्याने ते पुन्हा तेथे ठेवले. त्याला खूप आनंद झाला मग त्याने आपल्याकडे असलेले सर्व काही विकून आलेल्या पैशातून ते शेत विकत घेतले.
देवाचे राज्य एका मौल्यवान मोत्यासारखे आहे. जेव्हा मोत्याचा व्यापार करणाऱ्याला ते दिसले, त्यसाठी त्याने आपली सर्व मालमत्ता विकली व आलेल्या पैशाने ते मौल्यवान मोती विकत घेतले.
त्यानंतर येशूने लोकांना अझून एक गोष्ट सांगितली जे लोक आपल्या चांगल्या कामावर विश्वास ठेवतात. व दुसऱ्या लोकांना नीच समजतात. तो त्यांना म्हणाला, “ दोन माणसे प्रार्थना करण्यासाठी मंदिरात गेले. त्यादोघापैकी एक जकात वसूल करणारा होता व दुसरा खूप धार्मिक होता.”
धार्मिक माणूस अशी प्रार्थना केली, हे देवा, मी तुझे आभार मानतो की मी दुसऱ्या माणसासारखा पापी नाही. जे चोरी व व्यभिचार करतात त्यांच्याप्रमाणे मी नाही, व ह्या जकात वसूल करणाऱ्या सारखा पण मी नाही.
“उदा : मी आठवड्यातून दोन वेळा उपवास ठेवतो आणि आपल्या सर्व मिळकतीचा दशमांश तुला देतो “
“पण तो जकातदार त्या धार्मिक माणसापासून खूप लांब उभा राहून व स्वर्गाकडे न पाहता त्याएवजी, त्याने आपल्या हातानी छाती ठोकून ठोकून सांगु लागला, हे देवा माझ्या पाप्यावर दया कर.”
तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “ मी तुम्हांला खर सांगतो, देवाने त्या जकातदाराची प्रार्थना ऐकली व त्याला नीतिमान ठरविले. पण त्या धार्मिक माणसाची प्रार्थान देवाला आवडली नाही. देव प्रत्येक गर्विष्टाला नीच करेल, व जो स्वतःला नम्र करतो त्याला देव उंच करेल.
बायबल कथा :मत्तय 13 : 31 - 33, 44 - 46; मार्क 4 : 30 - 32; लूक 13 : 18 - 21; 18 : 9 - 14
खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।