35. दयाळू पित्याची गोष्ट

35. दयाळू पित्याची गोष्ट — चित्र 1

एक दिवशी, त्याच ऐकण्यासाठी जमलेले भरपूर जकातदार व पापी लोकांना येशू शिकवत होता.

35. दयाळू पित्याची गोष्ट — चित्र 2

काही धार्मिक पुढारी त्याठीकाणी होते व येशू पापी लोकांना व जकातदार लोकांना मित्रासारखे ठेवतो हे त्यांना दिसले आणि ते त्याच्यावर आपआपल्या मध्ये त्याची टीका करू लागले. तेव्हा येशुनी त्यांना ही गोष्ट सांगितली.

35. दयाळू पित्याची गोष्ट — चित्र 3

“एका माणसाला दोन मुले होते. लहान्या मुलाने त्याच्याकडे जाऊन म्हंटले, “बाबा, माझ्या वाट्याची मालमत्ता मला आता च्या आता द्या “आणि त्यामुळे त्यांच्या बापाने आपल्या संपत्तीतून दोन वाटे मुलांसाठी काढले.

35. दयाळू पित्याची गोष्ट — चित्र 4

“लवकर लहान मुलगा सर्व संपत्ती घेऊन परदेशी निघून गेला आणि तेथे त्याने वाईट गोष्टींमध्ये ती सर्व संपत्ती संपवून टाकली.”

35. दयाळू पित्याची गोष्ट — चित्र 5

“त्यानंतर, तो राहत होता त्या देशामध्ये खूप दुष्काळ पडला व त्याला अन्न विकत घेण्यासाठी पैसे उरले नाही. त्यावेळेस त्याला एक काम मिळाले ते काम होते शेतामध्ये डुकरे चारण्याचे, तो एव्हडा लाचार व भुकेला होता की डुकरे खात असलेली शेंग खाऊ की काय असे त्याला वाटत होते.

35. दयाळू पित्याची गोष्ट — चित्र 6

“नंतर, तो स्वतःला म्हणाला, “मी येथे काय करतोय ? “माझ्या बापाच्या घरामध्ये नोकर चाकर यांना खायला भरपूर अन्न असते. आणि मी येथे उपाशी तापाशी मरत आहे. मी आपल्या बापाच्या घरी परत जाईल आणि त्याचा एक सेवक किंवा दास म्हणून राहील. अशी त्यांना विनंती करेन.”

35. दयाळू पित्याची गोष्ट — चित्र 7

“अशा प्रकारे तो लाहान मुलगा आपल्या बापाकडे जाण्यास निघाला. तो लांब असतानाच, त्याच्या बापाने त्याला पहिले व त्याला त्याची खूप दया आली. त्याने पळत जाऊन त्याला मिठी मारली व त्याचे मुके घेतले.”

35. दयाळू पित्याची गोष्ट — चित्र 8

“मुलगा बापाला म्हणाला, “हे बाबा, मी देवाविरुद्ध व आपल्याविरुद्ध पाप केले आहे. मी तुमचा मुलगा म्हणण्याचा लायकीचा नाही.”

35. दयाळू पित्याची गोष्ट — चित्र 9

“पण त्याच्या बापाने एका दासाला बोलावून सांगितले, लवकर जा व माझ्या मुलासाठी चांगले कपडे आणा आणि त्याच्या अंगावर घाला त्याच्या हातामध्ये अंगठी घाला व पायामध्ये चपला घाला. मग एक चांगले वासरू कापून चांगली मेजवानी तयार करा व आपण सगळे आनंद करू. कारण माझा मुलगा मेला होता, तो आता जिवंत झाला आहे, तो हरवला होता,पण आता सापडला आहे.”

35. दयाळू पित्याची गोष्ट — चित्र 10

“अशाप्रकारे त्यांनी आनंद केला. त्यागोदर, मोठा मुलगा शेतामधून काम करून घरी परतला तेव्हा त्याला संगीत, व नाचण्याचा आवाज ऐकू आला व त्याला नवल वाटले “

35. दयाळू पित्याची गोष्ट — चित्र 11

“ज्या वेळेस मोठ्या मुलाला कळले की लहान भाऊ घरी परत आला आहे. तेव्हा तो खूप रागावला व घरात जाईना. त्याचा बाप बाहेर येऊन त्याला घरात येण्यासाठी व आनंद करण्यासाठी विनंती करू लागला. पण त्याने घरात जाण्यास नकार दिला.

35. दयाळू पित्याची गोष्ट — चित्र 12

“मोठा मुलगा आपल्या बापाला म्हणाला, इतकी वर्षे मी तुमच्या बरोबर विश्वासूपने काम करत राहिलो. मी तुमच्या सांगितलेल्या गोष्टी कडे कधी दुर्लक्ष केले नाही. तरीही माझ्या मित्रांसोबत आनंद करण्यासाठी तुम्ही मला लहानातले लहान करडू सुधा दिले नाही. पण तुमचा हा मुलगा सर्वी संपत्ती मालमत्ता वाईट मार्गाने उडवून टाकल्यावर आता परत घरी आला व तुम्ही त्याच्यासाठी एक चांगले वासरू कापले आहे. “

35. दयाळू पित्याची गोष्ट — चित्र 13

“बापाने त्याला दिले, “माझ्या मुला, तु नेहेमीच माझ्याबरोबर आहे, आणि माझ्याकडे जे काही आहे, ते सर्व तुझेच आहे. पण आता आपण आनंद करू कारण हे योग्य आहे. कारण तुझा हा भाऊ मेला होता, पण आता तो जिवंत झाला आहे. तो हरवला होता, पण आता तो सापडला आहे.”

बायबल कथा:लूक 15:11 - 32

रीडर में पढ़ें

खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।