36. येशूचे रुपांतर

36. येशूचे रुपांतर — चित्र 1

एका दिवशी, येशूने आपल्या शिष्यापैकी पेत्र, याकोब व योहान ह्या तिघांना आपल्या बरोबर घेतले.( योहान नावाचा येशूचा शिष्य, बाप्तिस्मा करणारा योहान नाही. ) ते प्रार्थना करण्यासाठी एक उंच डोंगरावर गेले.

36. येशूचे रुपांतर — चित्र 2

येशू प्रार्थना करत असताना त्याचा चेहरा सूर्याच्या प्रकाशासारखा झाला आणि त्याची वस्त्रे पांढरी शुभ्र झाली, इतकी की, ह्या पृथ्वीवर कोणीही बघितली नाही अशी पंढरी झाली.

36. येशूचे रुपांतर — चित्र 3

तेव्हा मोशे व एलीया हे संदेष्टे त्यांना दिसले. ही माणसे खूप वर्षापूर्वी ह्या पृथ्वीवर होऊन गेली होती. ते येशूच्या मरणाविषयी त्याच्याशी बोलत होते. जे यरुशलेम मध्ये घडणार होते.

36. येशूचे रुपांतर — चित्र 4

जेव्हा मोशे व एलीया हे येशूबरोबर बोलत होते, तेव्हा पेत्र म्हणाला, “इथे असणे आम्हाला सर्वाना खूप चांगले आहे. येथे आपण तीन मंडप बांधू, एक आपल्यासाठी, एक मोशेसाठी, व एक येलीयासाठी,” पेत्र काय बिलात होता त्याचे त्याला समजत नव्हते.

36. येशूचे रुपांतर — चित्र 5

पेत्र बोलत असतानाच, एका ढगाने त्यांना येऊन घेरले. त्या ढगातून अशी वाणी झाली की, “हा माझा मुलगा आहे. याच्यावर माझे खूप प्रेम आहे. मी याच्याविषयी खुश आहे. तुम्ही सर्व त्याचे एका, “ ते तिन्ही शिष्य खूपच घाबरले व जमिनीवर खाली पडले.

36. येशूचे रुपांतर — चित्र 6

तेव्हा येशूने त्यांना हाथ लावून उठवले व म्हंटले, “भिऊ नका उठा, “जेव्हा त्यांनी आपल्या आजूबाजूला बघितले, तेव्हा त्यांना कोणीच दिसले नाही. फक्त येशूच होता.

36. येशूचे रुपांतर — चित्र 7

येशू आणि ते तीन शिष्य परत डोंगरावरून खाली उतरले. तेव्हा येशू त्यांना म्हणाला की, इथे जे झाले ते कुठेही आणि कोनालापण सांगू नका. मी लवकरच मरेल व पुन्हा जिवंत होईल. त्यानंतर तुम्ही याविषयी लोकांना सांगू शकतात.

बायबल कथा :मत्तय 17:1-9; मार्क 9 : 2 - 8; लूक 9 : 28 - 36

रीडर में पढ़ें

खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।