38. येशूला विश्वासघाताने धरुन देण्यात येते
दरवर्षी, यहूदी सन साजरा करत असे. देवाने मिसर देशातून त्यांना गुलामगिरीतून बऱ्याच वर्षापूर्वी त्यांच्या पूर्वजांना कसे सोडवले ह्या गोष्टीची आठवण म्हणून ते लोक हा सन पाळत होते. येशूच्या सुवार्ता कार्यात स्पष्ट पणे सूरसुवात झाल्यानंतर सुमारे तीन वर्षांनी येशूनी आपल्या शिष्यांस सांगितले की यरुशलेम मध्ये त्यांच्याबरोबर सन साजरा करावा अशी माझी इच्छा आहे. आणि त्यानंतर तो तेथे मारला जाणार आहे. असेही त्याने सांगितले.
येशूच्या शिष्यांपैकी यहूदा नावाचा एक शिष्य होता, यहूदा हा प्रेषितांच्या पैशांच्या पिशव्या सांभाळणारा होता. तो खजिनदार होता. तो पैशाचा लालची असल्यामुळे अनेकदा तो ते पैसे चोरत असे. येशू आणि शिष्य यरुशलेम कडे आल्यावर, यहूदा धार्मिक पुढाऱ्याना जाऊन भेटला. व पैश्यांच्या बदल्याम्ध्ये तो येशूला धरून देण्यासाठी सांगतो. त्याला माहिती होते. की धार्मिक पुढारी येशू हा मसीहा आहे हे मानत नवते. व त्याला मारण्याची तयारी करत होते.
तेव्हा माहायाजक व यहूदी धार्मिक पुढारी मिळून, येशूचा घात करण्यासाठी यहूदाला चांदीच्या तीस नाणी दिले. संदेष्ट्याची भविष्यवाणी पूर्ण व्हावी म्हणून हे सर्व घडले. यहूदा त्यांच्यासाठी तयार झाला, व पैसे घेऊन गेला. तेव्हापासून तो येशूला धरून देण्याची वाट बघु लागला.
यरुशलेम मध्ये येशूने आपल्या शिष्यांसोबत वल्हांडण सन मनवला. भोजनाच्या वेळेस येशूने भाकर घेतली ती मोडली. व तो म्हणाला, “घ्या आणि खा,”हे माझे शरीर आहे, ते तुमच्यासाठी दिले जात आहे. माझ्या आठवणीत हे करा. “ त्याचप्रमाणे, येशूने सांगितले की त्याचे शरीर त्यांच्यासाठी बलिदान म्हणून देण्यात येत आहे.
मग येशू एक प्याला घेऊन म्हंटला, “ह्याच्यातून प्या, हे माझ्या नव्या कराराचे रक्त आहे. ते अनेकांच्या पापक्षमेसाठी ओतले जाणार आहे. तुम्ही प्याल, तेव्हा माझ्या आठवणीत हे सर्व करा.
मग येशू शिष्यांना बोलला, “तुमच्यापैकी एक व्यक्ती माझा घात करील. “तेव्हा त्यांना धक्का बसला आणि ते विचार करू लागले ही अशी गोष्ट कोण करील. येशू म्हणाला, “ ज्याला मी ही भाकर मोडून देईल तो माझा घात करेल “ मग त्याने यहूदास ती भाकर मोडून दिली.
यहूदाने भाकर घेतल्यावर, सैतान त्याच्यामध्ये घुसला. मग येशूला पकडून देण्यासाठी यहूदा तिथून जाऊन धार्मिक पुढाऱ्याकडे त्यांची मदत करण्यासाठी गेला. ती रात्रीची वेळ होती.
जेवण झाल्यावर, येशू आपल्या शिष्यासोबत जैतुनाच्या डोंगरावर गेला. येशू त्यांना म्हणाला, “आज रात्री तुम्ही सर्व मला सोडून जाल. असे लिहिले आहे की, मी मेंढपाळला मारील व मेंढरांची पळापळ होईल.
पेत्राने सांगितले, “जरी सर्वांनी तुला सोडले, तर मी तुला सोडून जाणार नाही. तेव्हा येशू त्याला म्हणाला, सैतानाने तुम्हांला सर्वाना मारण्याचे ठरवले आहे. पण मी तुमच्यासाठी प्रार्थना केली आहे. ह्यासाठी पेत्र की तुमचा विश्वास कमी होऊ नये. तरी पण आज रात्री, कोंबडा आरावण्याच्या आधी तु मला तीन वेळा नाकारशील,
तेव्हा पेत्र येशूला म्हणाला, “मला मारावे लागले तरी चालेल तरी पण मी तुला नकार देणार नाही”बाकीच्या शिष्यानीही तसेच म्हंटले.
मग येशू आपल्या शिष्यांना घेऊन गेथशेमानी बागेत गेला. शिष्यांनी परीक्ष्या मध्ये पडू नये म्हणून येशूनी त्यांना प्रार्थना करायला सांगितली. मग येशू पण प्रार्थना करण्यासाठी गेला.
येशूने तीन वेळा प्रार्थना केली. “हे पित्या, जर शक्य झाल तर, हा दुखःचा प्याला माझ्यापासून लांब कर. पण लोकांच्या तारणासाठी दुसरा मार्ग नसेल तर, तुझी इच्छा पूर्ण कर. “ येशू खूप व्याकूळ झाला व त्याचा घाम रक्ताच्या थेंबा सारखा जमिनिवर पडत होता. देवाने एका देवदूताच्या मदतीने येशूला शक्ती दिली.
प्रार्थना झाल्यावर जेव्हापण येशू शिष्यांकडे आला ते त्याला झोपलेले दिसले. जेव्हा तो तिसऱ्या वेळेस परत आला तेव्हा त्यांना म्हणाला “उठा माझा घात करणारे आले आहे”
यहूदा, धार्मिक पुढारी, सैनिक व एक मोठा लोकांचा घोळका त्याच्याकडे आला. आपल्यासोबत तलवारी, हत्यारे आणले होते. यहूदा येशूकडे येऊन म्हणाला, “सलाम, गुरु “ आणि त्याने येशूचा मुका घेतला. पकडणाऱ्या साठी ही त्याची खून होती की हाच येशू ख्रिस्त आहे. तेव्हा येशू त्याला म्हणाला, यहूदा, माझा मुका घेऊन मला धरून देतोस काय ?
सैनिक येशूला पकडत असतानी, पेत्राने आपली तलवार काढली व महायाजकाच्या सेवकाचा कान कापला. येशू म्हणाला, “तलवार बाजूला ठेव मी पित्याकडे बचावासाठी देवदूताचे सैन्य मागू शकत नाही काय ? पण मला देवाची इच्छा पूर्ण करायची आहे. मग येशूने त्या माणसाचा कान बारा केला व येशूला अटक झाल्यावर सर्व शिष्य पळाले.
बायबल कथा:मत्तय 26:14-56; मार्क 14 : 10-50; लूक 22 : 1-53; योहान 12:6; 18:1 - 11
खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।