39. येशूची चौकशी

39. येशूची चौकशी — चित्र 1

मध्य रात्रीची वेळ होती. सैनिक येशूची चौकशी करण्यासाठी त्याला महायाजकाकडे घेऊन गेले. पेत्र लांबूनच त्यांच्या पाठीमागे जात होता. ते जेव्हा येशूला आत घरामध्ये घेऊन गेले. तेव्हा पेत्र बाहेर थंडी मध्ये शेकत होता.

39. येशूची चौकशी — चित्र 2

घरामध्ये, यहूदी, व पुढारी येशूची चौकशी करत होते. त्यांनी येशू विरुद्ध बऱ्याच खोट्या गोष्टी तयार केल्या होत्या.पण त्यांच्या बोलण्यामध्ये ताळमेळ नव्हता म्हणून यहूदी लोकांना येशूचा गुन्हा सांगता आला नाही. त्या वेळेस येशू काहीच बोला नाही.

39. येशूची चौकशी — चित्र 3

शेवटी, महायाजाकने येशूला विचारले, “आम्हाला सांग, की तूच मसीहा आहे का ? देवाचा पुत्र,

39. येशूची चौकशी — चित्र 4

येशू म्हणाला, “मी आहे, आणि तुम्ही सर्व मला पित्याच्या बाजूला बसलेले व स्वर्गातून येताना बघाल, “तेव्हा महायाजकाने रागात आपले कपडे फाडले व सर्व लोकांसमोर मोठ्याने म्हणाला, “ आता आम्हाला दुसऱ्या गोष्टीची गरज नाही. तो देवाचा पुत्र आहे असे त्याने म्हंटले हे सर्वांनी ऐकले आहे, आता तुम्ही काय सांगणार ?

39. येशूची चौकशी — चित्र 5

सर्व यहूदी लोकांनी त्या याजाकाला सांगितले, हा मरण दंड देण्याच्या लायकीचा आहे. मग त्यांनी येशूच्या डोळ्यावर पट्टी बांधली, त्याच्या तोंडावर थुकले, व त्याला मारले त्याची मजाक उडवली.

39. येशूची चौकशी — चित्र 6

पेत्र बाहेर वात बघत होता, तेव्हा घरकाम करणाऱ्या एका बाईने त्याला म्हंटले, तूपण येशूबरोबर होताना, पेत्र नाही म्हंटला, नंतर दुसऱ्या वेळेस एका बाईने तसेच म्हंटले, आणि तेव्हापण पेत्राने नाही म्हंटले, मग तिसऱ्या वेळेस सर्व लोक म्हणाले की आम्हाला माहिती आहे की तु येशूबरोबर होता. कारण तुम्ही गालील प्रदेशामध्ये राहता.

39. येशूची चौकशी — चित्र 7

तेव्हा पेत्र शपथ घेऊन सांगायला लागला, जर मी त्या माणसाला ओळखत असेल तर देव मला शापित करो, तेव्हड्यात कोंबडा आरवला, आणि येशूने मागेवळून पेत्राकडे बघितले.

39. येशूची चौकशी — चित्र 8

तेव्हा पेत्र खूप दूर जाऊन रडला. त्यावेळेस, येशूला धरून देणारा यहूदा याने बघितले की, सर्व यहूद्यानी व पुढाऱ्यांनी येशूला मरणाची शिक्षा सांगितली आहे. तेव्हा यहूदाला आपल्या चुकीचा पस्तावा झाला व त्याने जाऊन आत्महत्या केली.

39. येशूची चौकशी — चित्र 9

दुसऱ्या दिवशी सकाळीच,यहूदा आणि बाकीच्यांनी येशूला पिलाता समोर आणले. त्यांना असे वाटत होते की पिलात येशूला दोषी समजून मरणदंडाची शिक्षा करेल. पिलाताने येशूला विचारले. “ तु यहूद्यांचा राजा आहेस काय ?

39. येशूची चौकशी — चित्र 10

येशूने त्याला उत्तर दिले. “तु असे म्हण पण माझे राज्य ह्याठिकाणी नाही. असे असते तर, माझे सेवक माझ्याकरता लढले नसते. मी ह्या जगात देवाविषयी खर सांगायला आलो आहे. खऱ्यावर प्रेम करणारे माझे ऐकतात. पिलाताने त्याला विचारले खरे काय आहे ?

39. येशूची चौकशी — चित्र 11

येशूसोबत बोल्यानंतर पिलात बाहेर येऊन लोकांशी बोलला, “मला ह्या माणसात काही अपराध दिसत नाही. “पण यहूदी लोक मोठ्याने म्हणाले, त्याला वधस्तंबावर खिळून मारून टाका” यावर पिलात खाली उतरला, “ तो निर्दोष आहे “ पण ज्यास्त मोठ्याने ओरडू लागले. तेव्हा पिलात परत म्हणाला तो अपराधी नाही.

39. येशूची चौकशी — चित्र 12

सर्व लोक आपल्या विरुद्ध होतील, ह्या मुळे पिलातला भीती वाटली, व त्याने आपल्या सैनिकांना सांगितले येशूला वधस्तंबावर खिळून टाका. रोमी सैनिकांनी येशूला फटके मारले, त्याच्या अंगावर एका राज्याचा झगा घातला व डोक्यात काट्यांचा मुकुट घातला. मग ते त्याची मजाक करायला लागले. “ हा बघा यहूद्यांचा राजा “

बायबल कथा :मत्तय 26: 57-27:26; मार्क 14 : 53 - 15: 15; लूक 22: 54 - 23 : 25; योहान 18 : 12 - 19:16

रीडर में पढ़ें

खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।