40. येशूला वधस्तंभावर खिळतात
सैनिकांनी येशूची मजाक केल्यानंतर, ते येशूला वधस्तभावार मारण्यासाठी घेऊन गेले. ज्या वधस्तंभावार त्याला मारायचे होते तो त्यांनी त्याच्या खांद्यावर दिला.
तेव्हा कवटी नाव असलेल्या ठिकाणी ते त्याला घेऊन गेले. आणि त्यांनी येशूच्या हातामध्ये व पायामध्ये खिळे ठोकले. पण येशू म्हणाला, हे पित्या, त्यांना क्षमा कर, कारण हे काय करत आहे हे त्यांना कळत नाही. “ पिलाताने त्यांना सांगितले की त्यांनी “ यहूद्यांचा राजा “ अशी लिहिलेली पाटी वधस्तंभाच्या वर येशूच्या डोक्यावर लावावी.
येशूचे कपडे वाटून घेतल्यानंतर सैनिकांनी चिठ्ठ्या टाकल्या. त्यांनी हे केले तेव्हा ही, वचन पूर्ण झाले, त्यांनी माझे कपडे आपसात वाटून घेतले.
येशूला दोन चोरांच्या मध्ये खीळण्यात आले होते. त्यापैकी एका माणसाने येशूची मजाक केली, पण दुसऱ्याने म्हंटले, “तु देवाला घाबरत नाही काय ? आपण दोषी आहे, पण हा तर निर्दोष आहे. तेव्हा तो येशूला म्हणाला. “ तुझ्या राज्यामध्ये माझी आठवण ठेव. “ येशू त्याला म्हणाला, “ आजच तु माझ्यासोबत सुखलोकात असशील.
यहूदी लोकांनी येशूची मजाक केली. ते त्याला म्हणाले, “जर तु देवाचा मुलगा आहे तर वधस्तंभावरून खाली ये व स्वतःला वाचव, म्हणजे आम्ही विश्वास ठेवू .
त्यावेळेस भर दुपारी आभाळात अंधार झाला. दुपारच्या तीन वाजेपासून सर्वीकडे अंधार निर्माण झाला.
तेव्हा येशू मोठ्याने म्हणाला, पूर्ण झाले, हे पित्या, मी माझा आत्मा तुझ्याकडे सोपवतो. “तेव्हा त्याने आपले डोके खाली सोडून जीव सोडला. जेव्हा येशू मरण पावला त्यावेळेस भूकंप झाला. आणि मंदिरातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटला.
आपल्या मरणाने, येशूने लोकांसाठी देवाकडे जाण्याचा मार्ग मोकळा केला. येशूवर पहारा करणाऱ्या सैनिकाने हे सर्व पाहून येशूचा स्वीकार केला. “ खरोखर हा माणूस निर्दोष होता. तो देवाचा मुलगा होता.
तेव्हा योसेफ आणि निकादेम हे दोघी यहुदी होते. ज्यांनी येशू हा मसीहा आहे हा विश्वास ठेवला होता. पिलाता कडे जाऊन येशूचे शरीर मागितले. त्यांनी त्याचे शरीर कापडात गुंडाळले व खडका मध्ये खोदलेल्या एका कबरे मध्ये ठेवले. मग त्यांनी त्या कबरेवर एक मोठी धोंड लोटली व कबर बंद केली.
बायबल कथाःमत्तय 27:27-61; मार्क 15:16-47; लूक 23:26-56; योहान 19:17-42
खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।