41. देव येशूला मेलेल्यातून उठवितो

41. देव येशूला मेलेल्यातून उठवितो — चित्र 1

सैनिकांनी येशूला वधस्तंभावर खिळल्या नंतर, विश्वास न ठेवणाऱ्या लोकांनी पिलातला म्हंटले, तो खोटारडा, येशू बोला होता. की तो तीन दिवसात उठेन. कोणीतरी त्या कबरेजवळ पहारा देणे गरजेचे आहे. नाहीतर त्याचे शिष्य त्याचे शरीर चोरून नेतील आणि मग तो उठला आहे असे सांगतील.

41. देव येशूला मेलेल्यातून उठवितो — चित्र 2

पिलात बोलला, काही सैनिकांना सोबत घ्या व कबरेच्या आजूबाजूला चांगला पहारा ठेवा. “तेव्हा त्यांनी त्या कबरेवर शिक्का मारला व सैनिकांना तेथे पहारा देण्यास ठेवले. की कोणी येशूचे शरीर चोरू नये.

41. देव येशूला मेलेल्यातून उठवितो — चित्र 3

येशूला कबरेत ठेवल्यावर दुसऱ्या दिवशी शब्बाथ होता, त्या दिवशी यहूद्याना कबरेकडे जाण्यास परवानगी नवती. तेव्हा शब्बथाच्या दुसऱ्या दिवशी सकाळीच, काही बाया वासाच तेल घेऊन कबरेकडे आल्या व त्यांनी येशूच्या उत्तर क्रीयासाठी हे सर्व केले होते.

41. देव येशूला मेलेल्यातून उठवितो — चित्र 4

तेव्हा अकस्मात, एक मोठा भूकंप झाला. विजेसारखा दिसणारा देवदूत आकाशातून उतरला. त्याने कबरेच्या तोंडाशी असलेली मोठी धोंड बाजूला केली. व त्यावर बसला. तेव्हा त्या कबरेवर पहारा करणारे खूप घाबरे झाले व मेल्यासारखे पडून राहिले.

41. देव येशूला मेलेल्यातून उठवितो — चित्र 5

जेव्हा त्या बाया कबरेजवळ आल्या, तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, घाबरू नका, येशू येथे नाही. त्याने सांगितल्या प्रमाणे तो जिवंत झाला आहे. ज्या कबरेत त्याला ठेवले होते. ती ही कबर बघा.” तेव्हा त्या बायांनी मध्ये जाऊन जेथे येशूच शरीर ठेवले होते. ती जागा पहिली. त्याचे शरीर त्याठिकाणी नवते.

41. देव येशूला मेलेल्यातून उठवितो — चित्र 6

तेव्हा तो देवदूत त्या बायांना म्हणाला, जा आणि शिष्यांना सांगा, येशू जिवंत झाला आहे व तो तुमच्यापुढे गालीलात जात आहे.

41. देव येशूला मेलेल्यातून उठवितो — चित्र 7

हे ऐकून बायांना खूप भीती वाटली व आनंद पण झाला. त्यांनी धावत जाऊन शिष्यांना ही आनंदाची बातमी दिली.

41. देव येशूला मेलेल्यातून उठवितो — चित्र 8

त्या बाया शिष्यांना ही बातमी सांगायला जात असताना, येशूने त्यांना दर्शन दिले. आणि त्यांनी त्याला नमन केले. येशू म्हणाला, घाबरू नका. जा आणि माझ्या शिष्यांना गालीलात यायला सांगा, मी तिथे त्यांना भेटेन.

बायबल कथाःमत्तय 27:62-28:15; मार्क 16:1-11; लूक 24:1-12; योहान 20:1-18

रीडर में पढ़ें

खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।