42. येशूचे स्वर्गारोहण ( येशू परत स्वर्गात जातो)

42. येशूचे स्वर्गारोहण ( येशू परत स्वर्गात जातो) — चित्र 1

येशू मेलेल्यातून ज्या दिवशी उठला, त्या दिवशी त्याचे दोन शिष्य जवळच्या एका नगरात चाले होते. ते चालत असताना, येशूविषयी जे घडले ते बोलत चालले होते. त्यांनी विश्वास ठेवला होता की येशू हा देवाचा मुलगा आहे. पण येशू मरण पावला होता व त्या बाया सांगत होत्या की तो परत जिवंत झाला आहे. आता कशावर विश्वास ठेवायचा. हे त्यांना समजत नवते.

42. येशूचे स्वर्गारोहण ( येशू परत स्वर्गात जातो) — चित्र 2

येशू त्यांच्या जवळ आला व त्यांच्याबरोबर चालू लागला. पण त्यांनी त्याला ओळखले नाही. ते कशाविषयी बोलत होते हे येशुनी त्यांना विचारले. आणि त्यांनी त्याला काही दिवसापूर्वी घडलेल्या येशू विशीच्या गोष्टी त्याला सांगितल्या. त्यांना वाटले की ते एका दुसऱ्या प्रवाश्याशी बोलत आहे की त्याला यरुशलेममध्ये झालेल्या गोष्टीविषयी काही माहिती नाही.

42. येशूचे स्वर्गारोहण ( येशू परत स्वर्गात जातो) — चित्र 3

तेव्हा येशू त्यांना, देवाच्या वचनात मसीहा विषयी काय सांगितले आहे. हे समजून सांगितले. त्याने त्यांना आठवण करून दिली की संदेष्ट्यानी सांगितले होते की मसीहा दुख भोगील, त्याला मारून टाकतील, पण तिसऱ्या दिवशी तो परत जिवंत होईल. जेव्हा ते दोघे जेथे त्यांना मुक्काम करायचा होता. तेथे पोहोचले, तेव्हा संद्याकाळ झाली होती.

42. येशूचे स्वर्गारोहण ( येशू परत स्वर्गात जातो) — चित्र 4

त्या दोघांनी येशूला आपल्याबरोबर मुक्कामी राहायला सांगितले. व तो त्यांच्याबरोबर राहण्यासाठी तयार झाला. ते संद्याकाळी जेवणासाठी बसले होते तेव्हा, येशूने भाकर घेऊन देवाचा धन्यवाद केला व ती मोडली मग त्यांनी तो येशू आहे हे त्यांना समजले. पण त्या वेळेस येशू त्यांच्यापासून दिसेनासा झाला,

42. येशूचे स्वर्गारोहण ( येशू परत स्वर्गात जातो) — चित्र 5

ते दोघजण एकमेकांना बोलायला लागले, तो येशू होता, आणि म्हणूनच तो देवाचे वचन आम्हाला समजून सांगत होता. आपले मन मधेच उद्या मारत होते. तेव्हा त्यांनी लगेच, यरुशलेम मध्ये जाऊन शिष्यांना ही बातमी दिली. “ येशू जिवंत झाला आहे “ आम्ही त्यला पहिले.

42. येशूचे स्वर्गारोहण ( येशू परत स्वर्गात जातो) — चित्र 6

शिष्य हे सर्व बोलत असताना, येशूने त्या खोलीत स्वतःला दाखवले. आणि म्हंटले, “तुम्हास शांती असो”शिष्यांना वाटले की तो भूत आहे. पण येशू म्हणाला, “ तुम्ही घाबरू नका व शंका घेऊ नका. माझ्या हाताकडे व पायाकडे बघा. जसे मला शरीर आहे तसे भूताना नसते. “ तो भूत नाही हे दाखवण्यासाठी, त्यांनी त्यांस खाण्यासाठी काहीतर मागितले. त्यांनी त्याला शिजवलेला मासा दिला. व तो त्याने खाल्ला.

42. येशूचे स्वर्गारोहण ( येशू परत स्वर्गात जातो) — चित्र 7

येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हांला सांगतो की माझ्याविषयी देवाच्या वचनात लिहिलेल्या गोष्टी होणे गरजेचे आहे. “मग त्याने त्यांची माने उघडली व त्यांना देवाचे वचन समजले. तो म्हनाला, अनेक वर्षापूर्वी असे लिहिले होते की मसीहा दुखः सहन करेल, त्याला मारून टाकतील व मरणातून तो तिसऱ्या दिवशी परत जिवंत होईल.

42. येशूचे स्वर्गारोहण ( येशू परत स्वर्गात जातो) — चित्र 8

नियमशास्त्रमध्ये असे लिहिले आहे की माझे शिष्य पापांच्या क्षमेसाठी पश्चात्तापाची घोषणा करतील. ते यरुशलेम पासून ह्या सुवर्तेला सुरुवात करतील. मग सर्व ठिकाणच्या सर्व लोकाकडे ही सुवार्ता जाईल. तुम्ही ह्या गोष्टीचे साक्षीदार आहात.

42. येशूचे स्वर्गारोहण ( येशू परत स्वर्गात जातो) — चित्र 9

पुढच्या चाळीस दिवसामध्ये, येशू बऱ्याच वेळा शिष्यांना स्वतःला दाखवत असे, एकदा तर तो 500 पेक्षा अधिक लोकांना दिसला. त्याने आपल्या शिष्यांना आपण जिवंत असल्याचे चिन्ह बऱ्याच प्रकारे दिले. व त्यांना देवाच्या राज्या विषयी शिकवले.

42. येशूचे स्वर्गारोहण ( येशू परत स्वर्गात जातो) — चित्र 10

येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “स्वर्गात व पृथ्वी वर सर्व अधिकार मला दिले आहे. म्हणून तुम्ही जा व सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा आणि त्यांना, पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या, आणि मी सांगितलेल्या सर्व गोष्टी त्याला पाळायला सांगा. आणि लक्षात ठेवा की मी नेहेमी तुमच्या बरोबर आहे.

42. येशूचे स्वर्गारोहण ( येशू परत स्वर्गात जातो) — चित्र 11

येशूच्या जिवंत झाल्यानंतर चाळीसाव्या दिवशी येशूने शिष्यांना सांगितले, “जोपर्यंत माझा पिता तुम्हास समर्थ पाठवत नाही ( पवित्र आत्मा ), तोपर्यंत यरुशलेम सोडून कुठेही जाऊ नका. “ मग येशू स्वर्गात गेला व ढगांनी त्याला त्यांच्या नजरेआड केले. सर्व गोष्टीवर अधिकार चालवण्यासाठी येशू देवाच्या उजवीकडे बसला आहे.

बायबल कथाःमत्तय 28:16-20; मार्क 16:12-20; लूक 24:13-53; योहान 20:19-23; प्रेषितांची कृत्ये 1:1-11

रीडर में पढ़ें

खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।