43. मंडळीची सुरूवात

43. मंडळीची सुरूवात — चित्र 1

येशू स्वर्गात गेल्यानंतर, येशूच्या आज्ञा प्रमाणे शिष्य यरुशलेम मध्ये राहिले. त्याठीकानाचे लोक विश्वास नारे एकत्र जमून प्रार्थान करण्यासाठी नेहेमी येत असत.

43. मंडळीची सुरूवात — चित्र 2

प्रत्येक वर्षी, वल्हांडणसनानंतर 50 दिवसांनी, यहूदी लोक पेंटेकॉष्ट नावाचा महत्वाचा सन साजरा करत असत. हा यहूदी लोकांचा कापणीचा वेळ होता. जगातील सर्व यहूदी लोक यरुशलेमेत येऊन पेंटेकॉष्ट साजरा करत. यावेळी येशूचे स्वर्गारोहण झाल्यानंतर जवळपास एक आठवड्या नंतर पेंटेकॉष्ट आला होता.

43. मंडळीची सुरूवात — चित्र 3

जेव्हा सर्व विश्वास नारे एकत्र आले तेव्हा अचानक ते बसले होते ती खोली वाऱ्याच्या आवाजाने भरून गेली. तेव्हा आगीच्या ज्वालासारख्या जीभा त्यांना सर्व विश्वास नार्यांच्या डोक्यावर दिसल्या. ते सर्व पवित्र आत्म्याने भरून गेले व वेगवेगळ्या भाषेत बोलायला लागले.

43. मंडळीची सुरूवात — चित्र 4

यरुशलेमेतील लोकांनी जेव्हा तो आवाज एकला तेव्हा हे काय आहे ते पाहण्यासाठी आले. जेव्हा लोकांनी विश्वासनाऱ्याना देवाची स्तुती व अद्भूत कामे सांगताना ऐकले व त्यांच्या मातृ भाषेत ती स्तुती देवाचे गौरव करताना ऐकले व त्या लोकांना खूप नवल वाटले.

43. मंडळीची सुरूवात — चित्र 5

काही लोकांना वाटले की विश्वास्णारे दारू पिऊन झिंगत आहेत. पण पेत्र बोलायला लागला, “माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या हे लोक दारू पिऊन झिंगत नाही तर ह्या द्वारे योएलचे वचन पूर्ण झाले. देवाने म्हंटले “ शेवटच्या दिवसात मी आपल्या आत्म्याचा वर्षाव करेल “

43. मंडळीची सुरूवात — चित्र 6

अहो इस्राएली लोकानो, येशूने देवाच्या सामर्थ्याने मोठे अद्भूत कामे केली. जे तुम्ही स्वतः आपल्या डोळ्यांनी बघितली. व तुम्हांला माहिती आहे. पण तुम्ही त्याला वधस्तंभावार मारले.

43. मंडळीची सुरूवात — चित्र 7

जरी येशू मेला होता, तरी देवाने त्याला मरणातून जिवंत केले. ह्या घटनेद्वारे हे वचन पूर्ण झाले. “तु आपल्या पवित्रास कबरेमध्ये कुजू देणार नाही.आम्ही ह्या सर्व गोष्टीचे पुरावे आहोत. की देवाने येशूला मरणातून जिवंत केले आहे.

43. मंडळीची सुरूवात — चित्र 8

येशू आता आपल्या देव पित्याच्या उजवी बाजूला उंच आहे. आणि येशूने वचन दिल्याप्रमाणे त्याने आमच्यासाठी पवित्र आत्मा पाठवून दिला आहे. आता जे काही तुम्ही पाहत व ऐकत आहा, त्या सर्व गोष्टी पवित्र आत्मा करत आहे.

43. मंडळीची सुरूवात — चित्र 9

“तुम्ही येशू ह्या माणसाला, वधस्तंभावर मारले. पण आता तुम्हांला समजू द्या की ज्याला तुम्ही नाकारले व वधस्तंभावर मारले त्याला देवाने प्रभू व ख्रिस्त बनवून ठेविले आहे”.

43. मंडळीची सुरूवात — चित्र 10

पेत्राचे भाषण ऐकणाऱ्यांच्या मनाला त्या गोष्टी खूप लागल्या. म्हणून त्यांनी पेत्र व अन्य शिष्यांना विचारले, “भाऊन हो आता आम्ही काय करायचं ?

43. मंडळीची सुरूवात — चित्र 11

पेत्र त्यांना म्हणाला, “तुम्हापैकी प्रत्येकाने आपआपल्या पापांचा पश्चात्ताप करून येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्यावा, म्हणजे देव तुम्हांला तुमच्या पापांची क्षमा करेल. मग तो तुम्हांला पवित्रआत्म्याचे दान पण देईल”

43. मंडळीची सुरूवात — चित्र 12

तेव्हा जवळपास 3000 लोकांनी पेत्राच्या बोलण्यावरून विश्वास ठेवला व येशुचे शिष्य झाले.त्यांनी बाप्तिस्मा घेतला व यरुशलेम च्या मंडळीला जाऊन मिळाले.

43. मंडळीची सुरूवात — चित्र 13

शिष्य प्रेषितांच्या शिक्षणात व संगतीत भाकर मोडण्यात व दुसऱ्या बरोबर प्रार्थना करण्यास तत्पर असत. ते आनंदाने एकत्र देवाची स्तुती करत व त्यांचे सर्वकाही सामाईक होते. सर्व लोक त्यांना खुश असत. प्रत्येक दिवशी त्यांच्यामध्ये नवीन विश्वासी त्यांच्यामध्ये येत असत.

बायबल कथाःप्रेषित 2

रीडर में पढ़ें

खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।