44. पेत्र व योहान एका भिका-यास बरे करतात
एक दिवशी पेत्र व योहान मंदिरामध्ये जात होते. ते मंदिराच्या पहिल्या गेटाजवळ जात असताना, त्यांनी एक लंगडा भिकारी भिक मागत असताना पहिला.
पेत्राने त्या लंगड्या माणसाला पाहून म्हंटले, “तुला देण्यासाठी माझ्याकडे काही पैसे नाही. पण माझ्याकडे जे आहे ते मी तुला देतो. येशूच्या नावामध्ये चालायला लाग”.
लगेचच तो लंगडा माणूस बारा झाला. तो चालू लागला व तो देवाची स्तुती करायला लागला.मंदिराच्या अंगणात लोकांनी त्याला पाहून खूप नवल केले.
त्या बऱ्या झालेल्या माणसाला बघण्यासाठी लोकांनी त्याच्याभोवती गर्दी केली. पेत्र त्यांना म्हणाला, “हा माणूस बरा झालेला पाहून तुम्ही का नवल करता ? आम्ही आमच्या सामर्थ्याने नाही किंवा आमच्या चांगल्या कामांनी त्याला बरे केले नाही. तर येशूच्या सामार्थ्याने व देवाने दिलेल्या विश्वासाद्वारे हा माणूस बरा झाला आहे.
तुम्ही रोमी राज्याला येशूला मारावयास लावले. तुम्ही जीवनदात्याला मारून टाकले. पण देवाने त्यास मरणातून परत उठविले. जरी तुम्ही काय करत होता. ते तुम्हास कळले नाही, तरी देवाने आमच्या कडून मसीहा दुखः सहन करेल व मारेल हे वचन पूर्ण करून घेतली आहे. यासाठी आता पश्चात्ताप करा व देवाकडे वळा म्हणजे तुमची पापे धुतली जातील.
मंदिरातील पुढारी पेत्र व योहान यांचे बोलणे ऐकून रागावले. म्हणून त्यांनी त्यांस धरून बंदिशाळेत टाकले. पण पुष्कळ लोकांनी पेत्राच्या वचनावर विश्वास ठेवला. आणि आता विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या जवळपास 500 झाली होती.
दुसऱ्या दिवशी, यहूदी पुढाऱ्यांनी पेत्र व योहान यांना महायाजकासमोर व इतर धर्म पुढाऱ्यांच्या समोर उभे केले. त्यांनी पेत्र व योहान यांना विचारले. “ तुम्ही कोणत्या शक्तीने ह्या लंगड्या माणसाला बरे केले ?
पेत्र त्यांना म्हणाला, “ हा माणूस येशू ख्रिस्ताच्या नावाने बरा झाला आहे. व तुमच्या पुढे आहे. तुम्ही येशूला मारले, पण देवाने त्याला परत जिवंत केले. तुम्ही त्याला नाकारले, पण येशू ख्रिस्ताशिवाय तारणाचा दुसरा मार्ग नाही.
हे ऐकून यहूदी पुढारी अचंबित झाले. की पेत्र व योहान सर्वसामान्य अडाणी माणसे आहे. तरीपण त्यांच्यासमोर मोठ्या हिमतीने बोलत होते. पण ते येशूच्या सहभागीतेत होते हे त्यांना समजले. मग त्यांनी पेत्राला व योहानाला चेतावणी देऊन सोडून दिले.
बायबल कथाःप्रेषित 3:1-4:22
खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।