45. फिलिप्प आणि कूशी अधिकारी
सुरुवातीच्या मंडळीमध्ये पुढाऱ्यांपैकी स्तेफन नावाचा एक पुढारी होता. तो एक इज्जतदार माणूस होता. तो खूप हुशार व पवित्र आत्म्याने भरलेला असा होता. स्तेफनाने बरेच चमत्कार केले होते. व लोकांनी येशूवर विश्वास ठेवावा यासाठी लोकांशी वादविवाद करत असे.
एक दिवशी स्तेफन येशूविषयी शिकवत असताना, विश्वास न ठेवणारे बरेच यहूदी लोक त्याच्याशी विवाद करू लागले. त्यांना स्तेफनाचा राग आला व त्याच्यावर त्यांनी यहूदी पुढारी यांच्यासमोर खोटे दोषारोप लावले. ते म्हणले, “ आम्ही त्याला मोशेविषयी वाईट बोलताना ऐकले. तेव्हा यहूदी पुढारी यांनी स्तेफनास अटक केली.व त्यास याजाकाच्या व इतर यहूदीपुढाऱ्यांसमोर आणले, तेथे त्याच्याविरुद्ध खोटे पुरावे उभे केले. व स्तेफनावर खोटे आरोप लाविले.
महायाजक स्तेफनास बोलला, “ ह्या गोष्टी खऱ्या आहे काय ? स्तेफनाने त्याला उत्तर दिले देवाने अब्राहामापासून ते येशू ख्रिस्तापर्यंत कशे अद्भूत कामे केली. देवाच्या लोकांनी कशाप्रकारे त्याच्या आज्ञा पाळल्या नाहीत. हे सांगितले. मग तो त्याना म्हणाला अहो ताट मानेच्या लोकानो, जसे तुमचे वाडवडील देवाच्या आत्म्याचा विरोद्ध करत होते. तसेच तुम्हीही त्यांच्यापेक्षा वाईट केले आहे. तसेच तुम्ही पण करत आहा. तुम्ही त्यांच्यापेक्षा वाईट आहे कारण तुम्ही मासिहाला मारुं टाकले.
जेव्हा यहूदी पुढाऱ्यांनी हे ऐकले, तेव्हा त्यांना खूप राग आला व त्यांनी आपल्या कानावर हाथ ठेवून मोठ्याने ओरडले व स्तेफानाला त्यांनी नगरा बाहेर ओढत नेले आणि त्याला दगड्मार केला.
स्तेफन मारत असताना, तो मोठ्याने म्हणाला, येशू माझ्या आत्म्याचा स्वीकर कर. मग त्याने गुढग्यावर येऊन परत मोठ्याने म्हणाला, “ प्रभू, हे पाप त्यांच्याकडे मोजू नको. मग त्याने जीव सोडला.
शौल नावाचा एक माणूस स्तेफनाला मारणाऱ्या लोकांशी सहमत होता. त्यांस दगड मार करण्यासाठी तो त्या लोकांचे वस्त्र सांभाळत होता. त्या दिवसामध्ये, यरुशलेममधील पुष्कळ लोक येशूच्या शिष्यांना मारहाण करत होते. म्हणून शिष्य दुसऱ्या ठिकाणी पळून गेले. पण, असे असतानाही, जेथे कोठे ते गेले, त्यांनी येशूची सुवार्ता सांगितली.
फिलीप्प नावाचा येशूचा शिष्य होणाऱ्या छळा मुळे पळून जाणाऱ्या विश्वासणाऱ्यापैकी एक होता. तो तेथून पळून शोमरोनामध्ये पळून गेला होता, व त्याठिकाणी त्याने येशूची सुवार्ता सांगितली व अनेकांचे तारण झाले. तेव्हा एक दिवशी, देवाच्या एका दूताने फिलीप्पाला सांगितले की एका रस्त्यावर जा. तो वाटेने चालत असताना फिलीप्पाने कुशी देशाचा एक अधिकारी आपल्या रथामध्ये बसून जाताना त्याने बघितले. देवाच्या आत्म्याने त्याला त्याच्याशी बोलायला सांगितले.
जेव्हा फिलीप्प रथाजवळ आला, तेव्हा त्याने तो कुशी षंढ यशयाचा ग्रंथ वाचत होता ते फिलीप्पाने बघितले. तो वाचन करत होता की “ त्याला मेंढराप्रमाणे वधासाठी नेले, आणि जसे कोकरू कापणाऱ्या पुढे शांत राहते, तसा तो आपले तोंड उघडीत नाही. त्यांनी त्याला वाईट वागणूक दिली. व त्याचा आदर केला नाही. त्यांनी त्यांला मारून टाकले.
फिलीप्पाने कुशी अधिकाऱ्याला विचारले, तुम्ही जे वाचत आहात, ते तुम्हांला समजते का ? कुशी माणसाने उत्तर दिले, “नाही जोपर्यंत मला कोणी समजून सांगितल्याशिवाय मला कसकाय समजेल. त्याने फिलीप्पाला आपल्या रथात बसायला सांगितले. त्याने विचारले संदेष्टा स्वतः विषयी असे लिहित आहे की कोण्या दुसऱ्या विषयी लिहित आहे ?
फिलीप्पाने त्या कुशीला समजून सांगितले की संदेष्टा हा मसीहा विषयी सांगत आहे. फिलीप्पाने दुसऱ्या वचनातून समजावून त्याला येशूची सुवार्ता सांगितली
फिलीप्प आणि कुशी अधिकारी पुढे जात असताना त्यांना पाण्याचे तळे दिसले. कुशी अधिकारी त्याला म्हणाला, “ बघा येथे पाणी आहे, मी बाप्तिस्मा घेऊ शकतो का ? आणि त्यांनी आपला रथ थांबवला,
मग ते दोघे पाण्यात उतरले, आणि फिलीप्पाने त्या कुशी अधिकाऱ्याला बाप्तिस्मा दिला. ते पाण्यातून वा आल्यानंतर पवित्र आत्मा फिलीप्पाला दुसऱ्या ठिकाणी घेऊन गेला तो त्या ठिकाणी येशू विषयी सांगत राहिला.
कुशी खूप आनंद करत आपल्या घराकडे चाला होता, कारण त्याला येशू कोण आहे ? हे त्याला समजले होते.
बायबल कथाःप्रेषित 6:8-8:5; 8:26-40
खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।