46. पौल ख्रिस्ती बनतो

46. पौल ख्रिस्ती बनतो — चित्र 1

शौल नावाचा तरुण स्तेफनाला दगड्मार करणाऱ्या लोकांचे कपडे सांभाळत होता. तो येशूवर विश्वास ठेवत नव्हता, म्हणून तो विश्वास ठेवणाऱ्या लोकांना त्रास देत होता. यरुशलेममध्ये घरो घरी जाऊन विश्वासू माणसाना व बायांना बंदिशाळेत टाकत होता. महायाजकाने शौलाला दिमिष्क मधील लोकांना ( विश्वासू ) पकडून यरुशलेममध्ये आणण्याची परवानगी दिली होती.

46. पौल ख्रिस्ती बनतो — चित्र 2

शौल दिमिष्काच्या वाटेवर जात असताना, अचानक त्याच्या आजूबाजूला आकाशातून उजेड चमकला आणि तो जमिनीवर पडला. शौलला कोणी तरी हाक मारत आहे असे त्याला आयकायला आले, शौला शौला मला त्रास का देतो? शौलाने विचारले, “ प्रभू तु कोण आहेस? तेव्हा येशूने त्याला म्हंटले, मी येशू आहे. ज्याला तु त्रास देत आहे.

46. पौल ख्रिस्ती बनतो — चित्र 3

शौल जेव्हा उठला, त्यावेळेस त्याला काही दिसले नाही. तेव्हा त्याच्या सोबत्यांनी त्याला दिमिष्कात आणावे लागले. शौलाने तीन दिवस काहीच खालले नाही

46. पौल ख्रिस्ती बनतो — चित्र 4

दिमिष्कात हनन्या नावाचा एक माणूस राहात होता. देव त्याला बोलला, की शौल राहात असलेल्या ठिकाणी जा व त्याच्यावर तुझे हाथ ठेव म्हणजे त्याला पुन्हा दिसेल. पण हनन्या म्हणाला, प्रभू मी ऐकले आहे की तो माणूस कसा विश्वासू लोकांना त्रास देतो. देव त्याला म्हणाला, जा कारण यहूदी लोकांमध्ये व परदेशी लोकांमध्ये माझे घेऊन जाण्यासाठी मी त्याला नेमले आहे. माझ्या नावासाठी तो खूप दुखः भोगणार आहे.

46. पौल ख्रिस्ती बनतो — चित्र 5

तेव्हा हनन्या शौलाकडे जाऊन त्याच्यावर आपले हाथ ठेवले व म्हणाला, जो येशू तुला रस्त्यावर दिसला, त्याने मला तुझ्याकडे पाठवलं आहे. ह्यासाठी की, तुला पुन्हा दिसावे व तु पवित्र आत्म्याने भरून जावे. लगेच शौल पुन्हा पाहू लागला, आणि हनन्याने त्याला बाप्तिस्मा दिला. मग शौलाने जेवण केले व त्याला बर वाटले.

46. पौल ख्रिस्ती बनतो — चित्र 6

लगेच शौल दिमिष्कामध्ये असलेल्या लोकांमध्ये सुवार्ता सांगू लागला, “येशू हाच देवाचा पुत्र आहे. लोकांना हे बघून खूप नवल वाटले की विश्वासू लोकांना त्रास देणारा आता स्वतःहा येशू विषयी बोलतोय त्याचा प्रचार करतोय. शौलाने नियमशास्राच्या प्रमाणे बोलून याहुद्याना सांगितले की येशू मसीहा आहे. हे सिद्ध केले.

46. पौल ख्रिस्ती बनतो — चित्र 7

पुष्कळ दिवसानंतर, यहूदी लोक शौलाला मारण्याची योजना करू लागले. शौलाला मारून टाकण्यासाठी लोकांनी त्याच्यावर नजर ठेवली होती. व शहराच्या वेशिनजिक काही लोकांना त्याच्यावर नजर ठेवण्यासठी ठेवले होते. पण शौलाला त्यांची योजना समजली व त्याच्या मित्रांनी त्याची सुटका केली. एका रात्रीच्या वेळेस वेशीच्या भिंतीवर एका पाटी (टोपली) मध्ये बसवून त्याला खाली सोडले. व शौल दिमिष्कातून सुटल्यावर येशूविषयी सुवार्ता सांगू लागला.

46. पौल ख्रिस्ती बनतो — चित्र 8

शौल यरुशलेममध्ये येशूच्या शिष्यांना भेटण्यासाठी गेला, पण त्यांना त्याची भीती वाटली. तेव्हा बर्नाबा नावाचा माणूस जो विश्वासू होता. त्याने शौलाला शिष्यांकडे नेले. व सांगितले की कश्याप्रकारे शौलाने दिमिष्कामध्ये येशूची सुवार्ता मोठ्या धेर्याने सांगितली. त्यानंतर शिष्यांनी त्याचा स्वीकार केला.

46. पौल ख्रिस्ती बनतो — चित्र 9

यरुशलेम मध्ये होत असलेल्या त्रासामुळे काही विश्वासू लोक अंत्युखीया मध्ये गेले. तेथे त्यांनी येशूविषयी सुवार्ता सांगितले. अंत्युखीया येथील लोकांमध्ये जास्त यहुदी लोक नव्हते, पण पहिलेच त्यांच्यापैकी भरपूर लोक विश्वास ठेवत होते. बर्णबा आणि शौल तेथील नवीन विश्वास ठेवणाऱ्या लोकांना शिक्षण देण्यासाठी व प्रोस्ताहन देण्यासाठी अंत्युखीयात गेले. अंत्युखीया मधल्या लोकांना पहिल्यावेलेस ख्रिस्ती म्हंटल्या गेले.

46. पौल ख्रिस्ती बनतो — चित्र 10

एक दिवशी, अंत्युखीया मधील लोक उपवास व प्रार्थना करत असताना, पवित्र आत्मा त्यांच्यावर आला व म्हणाला, “ बर्णाबा व शौल यांना ज्या कामासाठी मी नेमले आहे, त्यासाठी त्यांना वेगळे करा. तेव्हा अंत्युखीया येथील लोकानी ( मंडळी ) शौल व बर्णाबा यांसाठी प्रार्थना केली व त्यांच्यावर हाथ ठेवाले. आणि मग त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी येशूची सुवार्ता सांगण्यासाठी रवाना केले शौल व बर्णाबा यांनी भरपूर ठिकाणी सुवार्ता सांगितली व भरपूर लोकांनी येशूवर विश्वास ठेवला.

बायबल कथाःप्रेषित 8:3; 9:1-31; 11:19-26; 13:1-3

रीडर में पढ़ें

खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।