47. फिलिप्पै नगरामध्ये पौल आणि सीला

47. फिलिप्पै नगरामध्ये पौल आणि सीला — चित्र 1

शौल पूर्ण रोममध्ये प्रवास करत असताना,त्याने आपल्या पौल ह्या रोमन नावाचा फायदा घेतला एका दिवशी पौल आणि सिला हे फिलीप्ये नगरमध्ये येशूची सुवार्ता सांगत फिरत होते शहराच्या वेशी जवळ नदीच्या काठावर प्रार्थने साठी एक झालेल्या लोकांकडे ते गेले तेथे त्यांना लुदिया नावाची एक व्यापारी बाई भेटली ती देवावर प्रेम करणारी होती देवाची उपासना करणारी होती.

47. फिलिप्पै नगरामध्ये पौल आणि सीला — चित्र 2

देवाने लुदियाचे मन उघडले व तिने येशूच्या सुवार्तेवर विश्वास ठेवला,मग तिने आपल्या परिवारासोबत बाप्तिस्मा घेतला.तिने पौल व सिला यांना आपल्या घरी बोलाविले,तेव्हा ते तिच्या घरी तिच्या परिवारासोबत राहिले.

47. फिलिप्पै नगरामध्ये पौल आणि सीला — चित्र 3

पौल आणि सिला प्रार्थनेच्या जागेवर लोकांना वारंवार भेटले रोज ते त्या ठिकाणी जात असताना, एक दासी व दुष्टात्मा लागलेली मुलगी त्यांच्यामाघे जाऊ लागली ह्या आत्म्याच्या सहायाने ती लोकांचे भविष्य सांगायची अशा प्रकारे भविष्य सांगून ती आपल्या मालकाला भरपूर पैसे कमावून देत होती.

47. फिलिप्पै नगरामध्ये पौल आणि सीला — चित्र 4

ते रस्त्याने जात असताना ती मुलगी ओरडत राहिली, ही माणसे परात्पर देवाची माणस आहे. ते तुम्हांला तारणाचा मार्ग सांगत आहे. तिने भरपूर वेळा केले त्यामुळे पौलाला तिचा त्रास झाला.

47. फिलिप्पै नगरामध्ये पौल आणि सीला — चित्र 5

शेवटी एक दिवशी ती मुलगी ओरडू लागली, पौलाने तिच्याकडे बघून तिच्यात असणाऱ्या आत्म्याला म्हंटले, “येशूच्या नावाने मी तुला सांगतो हिच्यातून निघ, आणि त्याक्षणी तो आत्मा तिला सोडून गेला.

47. फिलिप्पै नगरामध्ये पौल आणि सीला — चित्र 6

हे बघून तिच्या मालकाला राग आला त्याच्या लक्षात आले की आत्म्याशिवाय ती मुलगी लोकांचे भविष्य सांगू शकत नाही, ह्याचा अर्थ तिने लोकांना त्यांचे भविष्य सांगावे म्हणून लोक त्याला आता पैसे देणार नाहीत.

47. फिलिप्पै नगरामध्ये पौल आणि सीला — चित्र 7

तेव्हा या मुलीच्या मालकानी पौल व सिला यांना रोमन अधिकाऱ्याकडे नेले व त्यांनी त्यांना मारहाण केली व तुरुंगात टाकले

47. फिलिप्पै नगरामध्ये पौल आणि सीला — चित्र 8

त्यांनी पौल व सिला यांना तुरुंगात आतल्या ठिकाणी ठेवले व त्यांचे पायात बेड्या अडकवल्या, तरीही ते मध्यरात्री देवाची स्तुती करत होते व गीत गात होते.

47. फिलिप्पै नगरामध्ये पौल आणि सीला — चित्र 9

अचानक, त्या ठिकाणी एक मोठा भूकंप झाला, तेव्हा तुरुंगाचे सर्व दरवाजे आपोआप उघडले व कैद्यांचे साखळदंड तुटून पडले.

47. फिलिप्पै नगरामध्ये पौल आणि सीला — चित्र 10

तेव्हा तुरुंगाचा अधिकारी जागा झाला, आणि जेव्हा त्याने तुरुंगाचे सर्व दरवाजे उघडे बघितले तेव्हा तो खूप घाबरला, त्याला वाटले की सर्व कैदी पळून गेले असतील. म्हणून तो आत्महत्या करणार होता. ( त्याला माहिती होते की कैदी जर पळून गेले तर रोमी अधिकारी त्याला जिवंत ठेवणार नाही ) पण पौल त्याला मोठ्याने हाक मारून म्हणाला थांब स्वतःला काही हानी करू नको आम्ही इथेच अहो.

47. फिलिप्पै नगरामध्ये पौल आणि सीला — चित्र 11

तुरुंगाचा अधिकारी पौल व सिला यांच्याकडे जात असताना घाबरत होता, तो म्हणाला, माझे तारण व्हावे म्हणून मी काय करू? पौलाने उत्तर दिले “ प्रभू येशूवर विश्वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या परिवाराचे तारण होईल. तेव्हा तुरुंगाच्या अधिकाऱ्यानी पौल व सिला यांना आपल्या घरी घेऊन गेला. आणि त्याने त्यांच्या जखमा धुतल्या. पौलाने त्याच्या परिवाराला येशूची सुवार्ता सांगितली

47. फिलिप्पै नगरामध्ये पौल आणि सीला — चित्र 12

तुरुंगाचा अधिकारी आणि त्याचे सर्व परिवारातले लोक यांनी येशूवर विश्वास ठेवून बाप्तिस्मा घेतला. तेव्हा तुरुंगाच्या अधिकाऱ्याने पौल व सिला यांना जेवण दिले, आणि त्यांनी एकत्र मिळून आनंद केला.

47. फिलिप्पै नगरामध्ये पौल आणि सीला — चित्र 13

दुसऱ्या दिवशी अधिकाऱ्यानी पौल व सिला यांची सुटका केली व ते शहर सोडून त्यांना जाण्यास सांगितले. तेव्हा पौल व सिला यांनी लुदिया व इतर भावना भेट दिली व नंतर त्यांनी ते शहर सोडले. येशूची सुवार्ता पसरत गेली व मंडळीची वाढ होत गेली.

47. फिलिप्पै नगरामध्ये पौल आणि सीला — चित्र 14

पौल व इतर ख्रिस्ती लोक येशूची सुवार्ता सांगत व शिक्षण देत अनेक शहरामध्ये फिरले. त्यांनी पुष्कळ पत्रे लिहिली व मंडळ्यातील विश्वास नाऱ्या लोकांना प्रोस्ताहन व शिक्षण दिले. त्यापैकी काही पत्रे बायबल मधील पुस्तके आहे.

बायबल कथाःप्रेषित 16:11-40

रीडर में पढ़ें

खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।